आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मेंदू हा शरीरातील खूप महत्वाचा अवयव आहे. म्हणूनच मेंदूचे आरोग्य चांगले असेल तरच शरीर आणि मन चांगले राहू शकते. मेंदूचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर चांगली जीवनशैली असणे गरजेचे आहे. मेंदू योग्यरीत्या काम करु शकत नाही किंवा तो कमकुवत होऊ लागतो तेव्हा तो याचे संकेत देत असतो. याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. या समस्येची पाच लक्षणे आपण जाणून घेणार आहोत.
काम न करणे
स्वंयस्फुर्त आणि कार्यक्षम असूनही योग्यरित्या काम करु शकत नसल्यास मेंदुच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरेजेचे आहे असे समजावे. डोक्याला एखादी जखम झाल्याचाही हा परिणाम असू शकतो. मनोभ्रंश हे सुरुवातीचे लक्षण असू शकते. यामुळे विचार करण्यास व निर्णय घेणे कठीण जाते.
उर्जा पातळी घटणे
मेंदु निरोगी असेल तर कामानूरूप तो उर्जा निर्माण करतो. मात्र काही वाईट सवयींमुळे या उर्जेवर परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त साखर, चुकीचा आहार, दारू, व्यायाम न करणे अशा गोष्टींमुळे मेंदुवर नकारात्मक परिणाम होतो.
मानसिक तणाव
नेहमी चिंतेत राहिल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जास्त ताण घेतल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल हार्मोनची निर्मिती होण्यास सुरुवात होते. हे हार्मोन मेंदु आणि शरीरासाठी त्रासदायक असतात.
कमजोरी जाणवणे
प्रत्येकाला कधी ना कधी कमजोरी जाणवते. परंतु, नेहमीच असे वाटत असेल तर मेंदुला अॅडीशनल सपोर्टची गरज असू शकते. यासाठी वेळीच डॉक्टरांकडे जा.
स्मरणशक्ती
वाढत्या वयासोबत विस्मरण होऊ लागते. मेंदु निरोगी असेल तर तुम्हाला कितीही जुनी गोष्ट आठवू शकते.