केस धुण्याच्या ‘या’ आहेत ४ प्राचिन पध्दती, तुम्ही सुद्धा करू शकता ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – सुंदर केसांसाठी शाम्पू वापरल्यास यातील केमिकल्समुळे केसांच्या समस्या वाढतात. प्राचिन काळातील लोक केस धुण्यासाठी मातीसारख्या गोष्टींचा वापर करत होते. यामुळे केसांची स्वच्छता होते. तसेच केसांची चमक वाढते. हेयर वॉश करण्याच्या ४ प्राचीन आणि साध्या पद्धतींची माहिती आपण घेवूयात.

काळी माती
चिकट काळी माती पाण्यात भिजवून केसांच्या मुळांना लावा. दोन मिनिटांनंतर केस धुवून घ्या.

आवळा
आवळा पावडरमध्ये रिठा मिसळून केसांना लावा. नंतर केस धुवून घ्या. केस गळती थांबते.

तांदूळाचे पाणी
जपानी महिला प्राचीन काळापासून तांदूळाच्या पाण्याने केस धुवतात. यामुळे केस स्वच्छ आणि चमकदार होतात.

मुलतानी माती
मुलतानी मातीमध्ये लेमन ज्यूस आणि पाणी मिसळून केसांना लावा. केसांची घाण दूर होते.