आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आरोग्यकडे दुर्लक्ष करणे, धावपळीचे जीवन, सकस आहाराचा अभवा, आदी कारणांमुळे शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता निर्माण होते. शरीरातील लोह कमी झाल्यानंतर हिमोग्लोबीनची कमतरता जाणवते. याचे शरीरावर विविध दुष्परिणाम दिसून येतात.
हे आहेत परिणाम
१ थकवा येतो.
२ भूक लागत नाही.
३ अशक्तपणा येतो.
४ चक्कर आल्यासारखे वाटते.
हिमोग्लोबीन वाढविण्याचे उपाय
* लाल पेशींचे घटलेले उत्पादन, रक्तपेशीच्या नाशात झालेली वाढ आणि रक्त
कमी होणे आदी निकष तपासले जातात.
* कमी हिमोग्लोबीनच्या पातळीनुसार ते वाढविण्यासाठी कोणती पद्धत वापरावी, हे ठरवले जाते.
* लाल पेशी संक्रमित करणे, इरिथ्रोप्रोटीन प्राप्त करणे, सप्लिमेंट्स घेणे, लोहयुक्त आणि जीवनसत्त्वांचा समावेश असलेले अन्न सेवन करणे, आदी उपाय सुचवले जातात.
महिलांनी घ्यावी विशेष काळजी
१ अॅनेमियाचा शोध घेण्यासाठी महिलांनी रक्ताची नियमित चाचणी करावी.
२ गर्भधारणा होण्याच्या वयात अॅनेमिया झाल्यास वाईट परिणाम होऊ शकतात.
Visit : arogyanama.com