आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन खूप जास्त असणे आणि खूपच कमी असणे हे दोन्ही आरोग्याच्यादृष्टीने योग्य नाही. यासाठी वजन कमी करण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. तसेच वजन वाढवण्यासाठी सुद्धा अनेकजण प्रयत्न करत असतात. कमी वजन हे खराब आरोग्याचे लक्षण आहे. वजन वाढवणे हे, वजन कमी करण्याएवढेच अवघड आहे. योग्य आहार आणि व्यायामाद्वारे वजन वाढवता येते.
हे लक्षात ठेवा
* चांगल्या आरोग्यासाठी वेगाने वजन वाढणे शक्य नाही. यासाठी धैर्य खूप आवश्यक आहे.
* वजन वाढवण्यासाठी कडक नियमांचे पालन करा. जास्त जेवण करा, अधिक वजन उचला आणि कधीच हार मानू नका.
* आम्र्स, चेस्ट आणि खांद्यांचा व्यायाम करू नये. असे केल्याने शरीर बेढब दिसायला लागेल आणि इजा होण्याची शक्यतादेखील राहील.
* वजन वाढवण्यासाठी दिवसातून कमीत कमी ३००-५०० कॅलरी अतिरिक्त घेण्याची गरज आहे. चीज, मांस, अंडी इत्यादीतूनही प्रोटीन मिळवू शकता.
* द्रव पदार्थांचे सेवन चांगला पर्याय आहे. दूध, मिल्कशेक्स किंवा प्रोटीन शेक्स कमी किंवा बिना साखरेचे घेऊ शकता. यामुळे भरपूर कॅलरी मिळेल.
* वजन वाढवण्यासाठी घाईघाईने जेवण केले पाहिजे. शरीराला भूक संपण्याचे संकेत देण्यास वेळ लागतो. त्यामुळे घाई-घाईने जेवण केल्यास जास्त खाऊ शकता.
* व्यायाम केल्याने स्नायू बळकट होण्यासोबतच तुटतात देखील. त्यांच्या रिकव्हरीसाठी भरपूर प्रोटीन असलेला आहार अवश्य घ्या. यामुळे तुम्हाला व्यायामासाठी ऊर्जाही मिळेल. याशिवाय तासांची झोपही खूप आवश्यक आहे.
* वजन वाढवण्यासाठी दिवसातून कमीत कमी पाच ते सहा वेळा थोडे थोडे जेवण करा. एकाच वेळी जास्त जेवण करू नका. जास्त खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.
* वजन उचलण्याचा व्यायाम केल्यास स्नायू बळकट होतात. नियमित व्यायाम केल्यास क्षमता वाढत जाईल.
* साधारणपणे जेवढी कॅलरी घेता, त्यापेक्षा ३०० ते ५०० कॅलरी जास्त घ्यावी. अधिक कॅलरी असलेल्या पदार्थांमध्ये सुका मेवा, चॉकलेट, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांचा समावेश आहे.