आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असायचे. या तुळशीरोपाची महिला सकाळी पूजा करत असत. सध्या फ्लॅट संस्कृति वाढली असली तरी अनेक घरात आजही तुळशीची जोपासना केल्याचे दिसून येते. कारण तुळशीचे धार्मिक महत्व असून यात औषधी गुणधर्म सुद्धा भरपूर आहेत. तुळशीचा चहा अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. यातील अँटीऑक्सीडेंट्समुळे अनेक आजार दूर होतात. हा चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. तुळशीचा चहा पिण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.
हे होतील फायदे
१ निरोगी त्वचा
यातील अँटीऑक्सिडेंट त्वचेला मुलायम आणि तजेलदार बनवतात.
२ कँसर
तुळशीच्या चहातील फ्लेवोनॉइड्स कँसर टाळण्यास मदत करतात.
३ प्रतिकारशक्ती
हा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजार दूर राहतात.
४ दमा
या चहामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात, ते दम्याला दूर ठेवतात.
५ सांधेदुखी
यातील अँटी इंफ्लेमेंटरी गुण सांधूदुखीला दूर ठेवतात.
६ डोळ्यांची शक्ती
तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळयांची शक्ती टिकून राहते.
७ डायबिटीज
हा चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळे डायबिटीज होत नाही.
८ हृदयरोग
याच्या सेवनाने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते, यामुळे हृदरोग टाळता येतात.
९ इन्फेक्शन
तुळशीच्या चहातील अँटी मायक्रोबियल गुणांमुळे इन्फेक्शन होत नाही.
१० रक्तदाब
हा चहा प्यायल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. यामुळे रक्तदाबाची समस्या होत नाही.