केसातील ‘कोंड्या’पासून मुक्तीसाठी करा ‘हे’ १० घरगुती आयुर्वेदिक उपाय
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोंड्याच्या समस्येने अनेकजण हैराण असतात. त्यात पावसाळा म्हंटलं की त्यात आणखीनच भर पडते . कोंड्यामुळे अनेकांना चारचौघांमध्ये मिसळताना विशेष काळजी घ्यावी लागते . कोंड्यावर अनेक औषधे देखील आहेत . परंतु या घरगुती उ[पायांनी स्वस्तात मस्त परिणाम दिसून येतील.
कोंड्यापासून मुक्तीसाठी करा हे १० घरगुती आयुर्वेदिक उपाय
१. दही –
दह्यामधील अॅसिटिक गुणधर्मांमुळे ते कोंड्यासाठी चांगला उपाय आहे. दही २ दिवस आंबट होण्यासाठी ठेवा. त्यानंतर हे दही डोक्यावर लावून किमान १ तास ठेवावे आणि त्यानंतर माईल्ड शाम्पूने धुवून टाकावे. हा उपाय आठवड्यातून २ वेळा करावा.
२. मेहेंदी –
कित्येक वर्षांपासून मेहेंदीचा उपयोग हा कंडिशनिंग आणि रंग चढवण्यासाठी केला जातो. पण मेहेंदीमध्ये असे काही गुणधर्म आहेत , ज्यामुळे कोंड्यापासून देखील मुक्ती मिळते.
३. कोरफड –
कोरफडीमध्ये अनेक असे गुणधर्म आहेत. ताजा कोरफडीचा गर काढून केसाच्या मुळांना लावावा. १ तासाने केस माईल्ड शाम्पूने धून टाका.
४. मेथी –
मेथ्या घरामध्ये सहजासहजी मिळतात. मेथ्याने थंडावा मिळतो. तसेच इन्फेक्शन देखील दूर होते.
५. डाळीचे पीठ –
डाळीच्या पीठाने कंडिशनिंग होते. डोक्याच्या त्वचेची स्वच्छता करण्यासाठी डाळीच्या पीठाने केस धुवावेत.
६. कडुनिंब –
कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवावेत. कडुलिंब अँटिफंगल आले त्यामुळे कोंड्यासह अॅलर्जी देखील दूर होते.
७. तुळस –
तुळशीची पाने आणि आवळा पावडर पाण्यात एकत्र करून हा पॅक लावावा. १ तासाने केस धुवून टाकावे.
८. लिंबू –
लिंबाचा रस कोंड्यासाठी रामबाण उपाय आहे . लिंबाचा रस पाण्यात घालून त्याने केस धुवून मग या लिंबूरसाच्या पाण्याने केस धुवून काढा.
९. आल आणि बिट –
आल आणि बिट पेस्ट एकत्र हे मिश्रण रात्री झोपताना लावावे . सकाळी धुवून टाकावे या उपायाने ४ – ५ दिवसात कोंडा निघून जाईन.
१०.सफरचंद – संत्री –
संत्री आणि सागरचंदाची पेस्ट करून हे मिश्रण अर्धा तास केसाच्या मुळांना लावून ठेवा. अर्धा तासाने माईल्ड शाम्पूने धुवून टाका.
Comments are closed.