आरोग्यानामा ऑनलाइन – पपईच्या रसामध्ये लिंबूचा रस मिसळल्यास आरोग्याचे अनेक फायदे होतात. पपई आणि लिंबूमधील पपाइनमुळे पोटाचे आजार दूर होतात. अपचन, गॅस, बध्दकोष्ठता किंवा भूक न लागण्याची समस्या हा ज्यूस घेतल्यास गायब होते. लिंबूच्या रसामुळे शरीरात ओलावा राहतो ज्यामुळे उष्णतेचा परिणाम कमी होतो. तात्काळ उर्जा मिळते. पपई आणि लिंबू दोन्हीमध्ये कॅलरी कमी असल्याने वजन कमी होते. मात्र या ज्यूसमध्ये साखर टाकू नये. या खास ज्यूसचे आणखीही काही फायदे असून ते आपण जाणून घेणार आहोत.
हे होतात फायदे
१ यातील व्हिटॅमिन सी मुळे शरीराला उर्जा मिळते.
२ अँटी इंमफ्लेमेटरी घटकांमुळे सांधेदुखी दूर होते.
३ यातील पपाईनमुळे परियड्स नियमित होतात. वेदना दूर होतात.
४ यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्समुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. सर्दी, खोकल्यासारखा त्रास होत नाही.
५ यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांची क्षमता वाढते.
६ पपईतील अँटिऑक्सिडेंट्स कँसरच्या उपचारात उपयोगी आहे.
७ यातील लायकापिनमुळे मांसपेशी मजबूत होतात.
८ पपईतील अँटिऑक्सिडेंट्समुळे रक्ताभिसरण चांगले होते. हार्ट अटॅकपासून बचाव होतो.
९ यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.
१० यामधील पपाईनमुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता या समस्या होत नाहीत.