इनफर्टिलिटीची समस्या दूर करण्यासाठी पुरूषांसाठी ‘हे’ १० पदार्थ, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तणाव, बिझी शेड्युल आणि अनियमित दिनचर्या अशा गोष्टींमुळे अनेक पुरूषांना लग्नापूर्वीच फर्टिलायजेशन तसेच सेक्स पॉवरबाबत अनेक शंका असतात. परंतु, यासाठी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. दैनंदिन सवयी आणि आहारामध्ये बदल करून तुम्ही या तणावातून मुक्त होऊ शकता. नाष्ट्यापासून ते लंच आणि डिनरमध्ये काही फ्रुट्स, स्नॅक्स आणि भाज्यांचा समावेश केल्यास यापैकी कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावणार नाही.
हे उपाय करा
* दररोज ताज्या फळांचे सेवन सेक्स लाइफसाठी आवश्यक आहे. स्पर्मची वृद्धी आणि त्यांना हेल्दी बनवण्यासाठी अँटी-ऑक्सीडेंट आणि फोलिक अॅसिडयुक्त फळांचे सेवन करावे. नाष्ट्यामध्ये फ्रुट सलाड घ्या.
* डाळींबाचे नियमित सेवन केल्यास शुक्राणूचा दर्जा वाढतो तसेच यौनशक्ती वाढते.
* अक्रोड स्पर्म वाढवण्यास मदत करते. यातील ओमेगा-३ फॅटी अॅसिडमुळे पुरुषाच्या लिंगामध्ये रक्तभिसरण वाढते.
* डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्पर्मचे प्रमाण वाढते. सेक्स लाइफ चांगली होते.
* पाणी शरीरातील सर्व व्यर्थ घटक सहजपणे बाहेर काढू शकते. स्पर्मचा दर्जा आणि यांची संख्या वाढते. जास्त पाणी प्याल तेवढेच चांगले आहे.
* लसणाच्या सेवनाने पुरुषाच्या शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहतो. जननांगामध्येही रक्तभिसरण होते. सेक्स हार्मोन नियंत्रित होतात. स्पर्म सशक्त होतात.
* केळामध्ये स्पर्म प्रोडक्शनला वाढवणारे आणि सेक्स पॉवरमध्ये सुधारणा करणारे व्हिटामिन ए, बी १ आणि सी भरपूर प्रमाणात असते.
Comments are closed.