आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आहारात काही खास ब्युटी फूडचा समावेश केल्यास चेहरा सुंदर होऊ शकतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा चमकदार होते. शिवाय केससुद्धा चमकदार होतात. हे ब्यूटी फूड्स कोणते आहेत, आणि ते कसे खावेत याविषयी विषयी माहिती घेवूयात.
हे आवश्य खा –
रताळी,
यामध्ये व्हिटॅमिन ए असते. तसेच रताळी अँटी एजिंग आहेत. हे सेवन केल्याने त्वचा सुंदर आणि मुलायम होते. रताळी उकडून, भाजून खाऊ शकता.
संत्रा,
संत्र्यात अँटीऑक्सीडेंट्स असल्याने तारूण्यपिटीका येत नाहीत. त्वचा काळवंडत नाही. केसगळती कमी होते. हे कापून खावे अथवा ज्यूस बनवून प्या.
मोड आलेले कडधान्य
हे खाल्ल्याने तारूण्यपिटीका येत नाहीत. केसाच्या समस्या कमी होतात. सलाड, सँडवीच तसेच भाज्यांमध्ये मिसळून खाऊ शकता.
पालक,
हे अँटी एजिंग फूड आहे. सुरकुत्या दूर करते. त्वचा तजेलदार होते आणि केस गळती थांबते. याचे सूप अथवा भाजी करून खाता येते.