वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – निरोगी आयुष्य जगण्यासाठी आज प्रत्येकाला योगा करण्याची नितांत गरज आहे. याबद्दल आपण अनेकदा वाचतो. आणि तस करण्याचंही ठरवतो. पण आपल्याला त्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे आपण नेमका योग करायचा कधी करायचा या विवंचनेत आपण असतो. परंतु , ज्यांना योगा करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांना काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण योग करण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला फिट राहण्यासाठी फक्त सूर्यनमस्कारही पुरेसे आहेत.
सूर्यनमस्कार हा १२ आसनांचा एक एकत्रित व्यायामप्रकार आहे. रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळेस सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. त्याचप्रमाणे शरीर निरोगी राहण्यासही मदत होते. सूर्यनमस्कारात क्रमाने केली जाणारी १२ आसनं, शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास, विषारी घटक बाहेर टाकण्यास तसेच ताणतणाव कमी करण्यास मदत करतात.
सूर्यनमस्काराचे फायदे खालील प्रमाणे
१) स्वास्थ्य सुधारते : योग्य प्रकारे व नियमित सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक व मानसिक शांतता मिळण्यास मदत होते.
२) पचनशक्ती सुरळीत : सूर्यनमस्कार करताना पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अपचनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी सकाळी नियमित रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करावेत.
३)अॅब्स मिळण्यास मदत : सूर्यनमस्कारामुळे पोटाजवळील स्नायूंचा व्यायाम होतो. नेहमीच्या वर्कआऊट सोबतच सूर्यनमस्कार केल्याने पोटाजवळील चरबी कमी होण्यास मदत होते.
४) शरीर डीटॉक्स होण्यास मदत : सूर्यनमस्कार करताना सतत दीर्घश्वास घेतल्याने व उच्छश्वास बाहेर सोडल्याने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे रक्त शुद्धीकरण होते.
५ ) मनाची अस्थिरता कमी होते : सूर्यनमस्कारामुळे स्मरणशक्ती सुधारते. व मज्जासंस्था शांत राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारल्याने मनाची अस्थिरता कमी होण्यास मदत होते.
६) लवचिकता वाढते : सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम असल्याने तो नियमित केल्यास शरीर निरोगी व लवचिक बनते.
७) मासिक पाळीच्या समस्या कमी : अनियमित मासिकपाळीची समस्या असलेल्या स्त्रियांनी नियमित सूर्यनमस्कार केल्यास या समस्येतून आराम मिळतो.
८) आपण तरुण दिसतो : सूर्यनमस्कारामुळे त्वचेची कांती सुधारते तसेच वृद्धपकाळात चेहर्यावर पडणार्या सुरकुत्यांपासून सुटका होते. या व्यायामप्रकारामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो परिणामी सौंदर्य सुधारण्यास मदत होते.