आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मेकअपमधला आविभाज्य घटक म्हणजे लिपस्टिक. ओठांचे सौंदर्य खुलवणारी व दैनंदिन मेकअपचा भाग झालेली लिपस्टिक मात्र महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. कारण लिपस्टिक तयार करण्यासाठी अनेक हानिकारक धातूंचा वापर केला जातो. सध्याच्या ५५% लिपस्टिक्समध्ये विषारी तत्वं असल्याच आढळून आलं आहे. लिपस्टिक हा दैनंदिन मेकअपचा भाग झाला आहे. मात्र अनेक ब्रॅन्डेड लिपस्टिकमध्ये शिसे, कॅडियम, क्रोमियम, अॅल्यूमिनिअम यांसारखे हानिकारक धातू आढळले आहेत.
लिपस्टिकमधील हे धातू ठरतात गंभीर आजारांचे कारण –
लेड – लेड या रसायनामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसेच कॅन्सरलाही लेड कारणीभूत ठरते. लेडमुळे स्मरणशक्ती कमी होणे, आय क्यू कमी होणे, चिडचिड वाढणे अशा समस्या होतात.
कॅडमियम – कॅडमियममुळे किडनीच्या वेगवेगळ्या समस्या उद्धभवतात . तसेच कॅडमियमच्या अधिक सेवनामुळे महिलांना स्तनांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. मॅग्नेशिअम अधिक प्रमाणात पोटात गेल्याने स्नायूंचे त्रास होऊ लागतात. अॅल्यूमिनियम पोटासाठी घातक आहे. अॅल्यूमिनियममुळे पोटांचे वेगवेगळे विकार वाढू शकतात.
क्रोमियम – नॉर्मल लिपस्टिकमध्ये सर्वात जास्त क्रोमियम आढळून आले आहे. त्यामुळे पोटात ट्यूमर होऊ शकतो. तसेच ज्या महिला एकदा लिपस्टिक लावल्यावर ते पुन्हा पुन्हा ठिक करतात त्या महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यांच्या पोटात रोज जवळपास ८० मिलि ग्रॅम लिपस्टिक जाते.