आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मायग्रेन या आजाराचे प्रमाण अलिकडे खुप वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे डोकेदुखीसारख्या आजाराकडे किरकोळ आजार म्हणून पाहून दुर्लक्ष करू नका. वेळीच या आजाराचे निदान झाल्यास औषधोपचार करता येतात. मायग्रेन हा त्रासदायक आजार आहे. यावर कोणते उपाय आहेत, कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
अशी घ्या काळजी
१ मायग्रेनचा त्रास असल्यास उपाशी राहू नये
२ दररोज १२ ते १५ ग्लास पाणी प्यावे.
३ जास्तवेळ टीव्ही पाहू नये. कम्प्युटरवर, मोबाइलचा वापर कमी करा.
४ उन्हामध्ये फिरणे टाळा, डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका.
५ कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी काम करणे टाळा.
६ गरजेपेक्षा अधिक किंवा कमी झोपल्याने त्रास होऊ शकतो.
Visit : arogyanama.com