आरोग्यनामा ऑनलाइन टीम : महिला आणि पुरुषांच्या पोषक द्रव्यांच्या गरजा वेगळ्या असतात. ठराविक वयानंतर पुरुषांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता निर्माण होते. निरोगी राहण्यासाठी त्यांची खूप गरज असल्याने उपाय करणे गरजेचे असते.आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर ही कमतरता पूर्ण दूर करता येणे शक्य असते. पुरूषांना कोणते ७ व्हिटॅमिन्स आवश्यक आहेत आणि त्यांची गरज कशी पूर्ण करावी ते पाहुयात :
व्हिटॅमिन बी३६ मुळे पुरूषांची प्रतिकार क्षमता चांगली राहते.आजारांपासून बचाव होतो. लाल रक्त पेशींची संख्या वाढवण्यास मदत होते. तसेच नव्र्हसचे फंक्शन चांगले होते. १.३ मिलिग्रॅम प्रमाणात याची नियमित गरज असते. ते बीन्स, नट्स,अंडी, मासे, होल ग्रेन, मांस, बटाटे यामधून मिळते. तर व्हिटॅमिन बी१२ हे रक्त आणि मेंदूचे कार्य सामान्य ठेवण्यासाठी गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते. दररोज जवळपास २०४ मिलिग्रॅम याची गरज असते. मांस, चिकन, दूध, दही, पनीर, अंडी यामधून ते मिळते. व्हिटॅमिन डी वाढत्या वयाचा प्रभाव कमी करते. मेंदू आणि हृदयविकारांपासून आजारांपासून बचाव करते. शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक असते. याची ६०० आयु नियमित गरज असते. हे मिळवण्यासाठी सूर्य किरणे उत्तम स्रोत आहे.
मासे आणि दुग्धजन्य पदार्थांतूनही मिळते. मॅग्नेशियम शरीराला मिळाल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते. हृदयविकार, मधुमेहाचा धोका कमी करते. कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते. याची ३२० मिलिग्रॅम नियमित गरज शरीराला असते. ते हिरव्या पालेभाज्या, नट्स, बीन्स, सोयाबीन इत्यादी मधून मिळते. पुरुषांची हाडे, स्नायू, नव्र्हस आणि हृदयाचे कार्य सामान्य ठेवण्यासाठी कॅल्शियम गरजेचे असते. जवळपास १००० मिलिग्रॅम कॅल्शियमची नियमित गरज असते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, बदाम, सोयाबीन, संत्री, मासे यामधून ते भरपूर प्रमाणात मिळते. तसेच व्हिटॅमिन ए डोळ्यांना निरोगी ठेवते. दृष्टी लवकर कमजोर होत नाही. हाडे मजबूत राहतात आणि आजारांपासून बचाव करण्यास मदत होते. ७००-९०० मायक्रोग्रॅम (२३००-३००० आयु) नियमित व्हिटॅमिन ए ची गरज शरीराला असते. ते दूध, दुग्धजन्य पदार्थ, रताळी, ब्रोकली मधून मिळते. व्हिटॅमिन के हे ब्लड क्लॉटिंगमध्ये मदत करून अंतर्गत आणि बाहेरील ब्लडिंग होऊ देत नाही. हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. याची १२२-१३८ मायक्रोग्रॅम नियमित गरज असते. ते पालक, ब्रोकली अशा हिरव्या भाज्या. सोयाबीन तेलातून मिळते.