आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपण सुंदर दिसावे, असे प्रत्येकाला वाटते. त्यातही महिलांमध्ये सुंदर दिसण्याची प्रचंड ओढ सतत असते. यासाठी त्या विविध उपाय करत असतात. तारूण्य टिकवण्यासाठी रसायनयुक्त क्रिम्सचा वापर केला जातो. परंतु, अशा क्रिम्स अथवा औषधांमुळे नंतर चेहरा खराबही दिसू लागतो. तसेच काही महिला मेकअपने आपले सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे तात्पुरते सौंदर्य उपयोगाचे नाही. यासाठी नैसर्गिक उपाय करणे खुप आवश्यक आहे. तरच तुम्ही सदैव तरूण दिसू शकतो.
तारूण्य टिकवण्याच्या प्रक्रियेत शरीरावरील त्वचा महत्वाची भुमिका पार पाडते. व्हिटॅमिन ‘सी’ चे योग्य प्रमाणातील सेवन त्वचेला आणि शरीराला चिरतरूण ठेवण्यासाठी उपयोगी आहे. व्हिटॅमिन सी ‘ला एसकोरबिक’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. व्हिटॅमिन सी मुळे शरिरातील रक्त वाहिन्या मजबूत होतात. दिर्घकाळासाठी तरूण दिसण्याकरता व्हिटॅमिन सी चे योग्य प्रमाणात सेवन शरिरासाठी उपयोगी ठरते.
तसेच शरीरात जर व्हिटॅमिन सी ची कमतरता निर्माण झाल्यास तोंड पिवळे पडणे, शरीरात थकवा जाणवणे, अंग दुखणे, हिरड्या सुजणे, भुक कमी लागणे, हाडे ठिसूळ होणे, चिडचिडेपणा, सर्दी आणि निमोनिया सारखी आजार सतत होणे, थोडे काम केल्यानंतर लगेच थकवा जाणवणे, असे त्रास सुरू होतात. व्हिटॅमिन सी मिळण्याचे विविध स्त्रोत आहेत. ते संत्रा, लिंबू, मोसंबी, आवळा, धने, टमाटर, मुळा, पत्ताकोबी आणि पालक यामधून शरीराला मिळू शकते.