आरोग्यनामा ऑनलाईन- अनेक लोक असे आहेत ज्यांना मुळ्याची भाजी(Valuable leaves) अजिबात आवडत नाही. परंतु मुळा आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. आज आपण मुळ्याच्या पानांबद्दल(Valuable leaves) जाणून घेणार आहोत. काही लोक तर असेही आहेत जे मुळ्याची पानं खाण्याची कल्पनाही करणार नाहीत.
परंतु मुळ्याप्रमाणेच मुळ्याच्या पानांचाही शरीराला खूप फायदा होतो. आज आपण याच फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत. कदाचित हे फायदे वाचल्यानंतर मुळा किंवा त्याची पानं न आवडणारी व्यक्तीही याचं सेवन करतील.
मुळ्याच्या पानांचे फायदे –
1) अन्नपचन सुरळीत होतं.
2) त्वचा उजळ्यास याची खूप मदत होते.
3) मधुमेहींसाठी मुळ्याची पानं खूप गुणकारी आहेत.
4) अशक्तपणा दूर होतो.
5) हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
6) शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
7) मुळ्याच्या पानांचं सेवन केलं तर कर्करोगासारख्या आजाराचा प्रतिकार करण्यासाठीही याची मदत होते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.