डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : पावसाळ्यात डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. या समस्येपासून बचाव करण्याच्यासाठी काही घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. हे घरगुती उपाय केल्यास डोळ्यांचे इन्फेक्शन दूर होते तसेच थकवाही दूर होतो. डोळ्यांना खाज येणे, सूज यासारखे सामान्य त्रास सहज बरे होतात. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा उपयोग करून हे घरगुती उपाय करता येतात.
ते कसे करावेत, याविषयीची माहिती पुढील प्रमाणे :
१ मध पाण्यात टाकून उकळवा नंतर या पाण्यात कापूस बुडवून डोळ्यावर ठेवा.
२ पाण्यात जवस टाकून उकळवा, या पाण्यात कापूस भिजवून तो डोळ्यावर ठेवा याने संसर्ग कमी होईल.
३ कापूस गुलाबपाण्यात भिवून डोळ्यावर ठेवा.
४ कोथेंबीर पाण्यात टाकून उकळवा, या पाण्याने डोळे स्वच्छ धुवून घ्या.
५ ग्रीन टी बॅग्ज उकळवून नंतर त्या फ्रिजमध्ये तासभर ठेवा, थंड झाल्यानंतर डोळ्यावर ठेवा.
६ बोरिक अॅसिड पाण्यात मिसळून या पाण्याने डोळे धुवून घ्या.
७ पाण्यात अॅपल साइड व्हिनेगर मिसळून दिवसातून तीन ते चार वेळा डोळे धुवा.