आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. फास्टफूड आणि बाजारातील अन्य पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या या समस्या वाढत आहेत. पोटदुखीचा हा त्रास काही घरगुती उपाय करून कमी करता येऊ शकतो. हे घरगुती उपाय कोणते आहेत, याविषयी जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ कोरा चहा प्यायल्याने पोटदुखी थांबते
२ आल्याच्या रसामध्ये मध मिसळून घेतल्यास पोटदुखी थांबते
३ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून पाण्यातून घ्यावे. यामुळे पोट दुखायचे थांबते.
४ अर्धा चमाचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा लेमन ज्यूसमध्ये काळे मीठ टाकून घेतल्यास पोटदुखी थांबते.
५ आल्याचा रस नाभीवर लावल्याने व हलकी मॉलिश केल्याने पोटदुखी थांबते.