आरोग्यनामा ऑनलाईन टीम : (डॉ. संतोषी गायकवाड) – भारतात उगम पावलेल्या प्राचीन आयुर्वेदात आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक गोष्टीवर व आजारांवर भाष्य केलेले आहे. भावी पिढी कर्तृत्ववान, हुशार व सर्वगुणसंपन्न होण्यासाठी आयुर्वेदामध्ये मुलाची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ होत असताना विविध संस्कार वर्णन केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुवर्ण बिंदू प्राशन. आयुर्वेदात निरोगी, सुदृढ, दीर्घायुषी आणि बुद्धीमान संततीसाठी सुवर्णबिंदू प्राशन सांगितलं आहे. यामध्ये बाळाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी वेगवेगळी द्रव्ये व सुवर्ण हे मधातून बाळास चाटवले जाते.
सुवर्ण बिंदू म्हणजे काय ?
लहान मूल जन्माला आल्यानंतर सामान्यतः आपल्याकडे त्याला मध आणि सोनं चाटवले जाते. त्यामागचे शास्त्र म्हणजे आयुर्वेदात वर्णिलेले सुवर्ण बिंदू होय. सुवर्णभस्म (सोन्याचा भस्म) , शंखपुष्पी आणि ब्राम्ही यांच्या मिश्रणापासून सुवर्ण बिंदू तयार करतात.
सुवर्ण बिंदू हे लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्यांना सुदृढ करणारे आणि त्यांची बुद्धिमत्ता वाढवणारे आहे.
सुवर्ण बिंदू कोणाला द्यावे –
नवजात बालकापासून ते सोळा वर्षांच्या मुला-मुलींना देता येते. त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही.
कधी द्यावे –
पुष्य नक्षत्राच्या दिवशी मुलांवर ‘सुवर्णप्राशना’चे संस्कार करणे अधिक उपयोगी ठरते.
प्रत्येक महिन्याच्या पुष्प नक्षत्राला आपल्या माहितीतील आयुर्वेद डॉक्टरकडून सुवर्ण बिंदू बालकाला द्यावे.
सुवर्णबिंदू प्राशनाचे फायदे –
-मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी सुवर्णबिंदू उपयुक्त आहे.
-सुवर्णबिंदू मुलांच्या शारीरीक वाढीला प्रोत्साहन देऊन त्यांना निरोगी आरोग्य देते.
-मुलांची बुद्धी अधिक तल्लख होते.
-बालकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-भूक वाढते , पचनशक्ती सुधारते.
-शारीरिक बल वाढते.
-सुवर्णबिंदूच्या प्राशनाने आकलनशक्ती व स्मृती चांगली राहते.
-सुकुमार कांती प्राप्त होते.
-दात येताना होणारा त्रास कमी होतो.
-प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते.
-वातावरणातील बदलांपासून बचाव होतो.
(शब्दांकन : सुप्रिया थोरात – 9834204222)
‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे
‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व
स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा