आरोग्यनामा टीम – प्रत्येकालाच नेहमी फिट रहायचे आहे. तंदुरुस्त होण्यासाठी लोक काय-काय करतात. बर्याच सर्वेक्षणांनुसार, शरीरातील चरबीमुळे तुम्ही बर्याच आजारांचे बळी होऊ शकता. अशात तुम्ही पोटातील चरबी कमी करण्यासह तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाश्ता देखील स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. अशात जर तुम्हाला नेहमी स्लिम ट्रिम रहायचे असेल, तर अशा ५ गोष्टी आहेत ज्या तुम्ही न्याहारीमध्ये खाऊ नयेत.
प्रोसेस्ड फूड
अशा पदार्थांना बर्याचदा शिजवून घ्यावे लागते. तसेच तेल, मसाले आणि तूप हे पदार्थ असल्यामुळे ते आरोग्यासाठीही चांगले नसतात. तुम्ही चिप्स, पॉपकॉर्न, ड्राई फ्रूट्स, स्नॅक्स इत्यादीपासून दूर रहावे.
केक, बिस्किट्स
केक आणि बिस्किट्समध्ये मैद्याशिवाय तूप आणि क्रीमही वापरतात, जे तुमच्या तंदुरुस्तीसाठी अजिबात योग्य नाही, त्यामुळे तुम्ही या गोष्टी न्याहारीत खाऊ नयेत.
नूडल्स
नूडल्स खाण्यासाठी तर खूप चांगले आहेत, पण ते आरोग्यदायी ब्रेकफास्ट म्हणून मानले जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही न्याहारीत नूडल्स अजिबात खाऊ नयेत.
फळांचा रस
तुम्ही बाजारात उपलब्ध फळांचा रस पिणे टाळले पाहिजे, उलट तुम्ही घरीच फळांचा रस करून पिऊ शकता. जर तुमच्याकडे रसऐवजी फळ खायला वेळ असेल, तर तेही उत्तम आहे.
भजी-कचोरी
सकाळ-सकाळ तळलेले पदार्थ खाणे अजिबात योग्य नाही. जर तुम्ही सकाळी भजी आणि कचोरी यासारख्या तळलेल्या गोष्टी खाल्ल्या नाहीत, तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असेल.