आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोळी या किटकापासून तयार केलेल्या उपायामुळे ४५ दिवसांमध्ये डासांना ९९ टक्के नष्ट करता येऊ शकते. शास्त्रज्ञांनी कोळीच्या विषापासून मेथारिझियम पिंग्सहेंस फंगस तयार केले असून त्याच्या संपर्कात येताच डास मरतात. यामुळे मलेरिया रोखण्यास मदत होऊ शकते. आफ्रिकेच्या बुर्किना फासोमध्ये हा प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी झाला आहे. अमेरिकेच्या मेरीलँड विश्वविद्यालयातील अभ्यासकांनी मलेरिया रोखण्यासाठी हा नवा उपाय शोधला आहे.
हे संशोधन करण्यासाठी संशोधकांच्या पथकाने बुर्किना फासोमध्ये ६५०० वर्ग फूट क्षेत्राची निवड केली होती. मच्छरदानीच्या आत १५०० डासांसोबत फंगसयुक्त कापड ठेवले होते. ४५ दिवसांनंतर १३ डास सोडून सर्व डासांचा मृत्यू झाला होता. या प्रयोगातून फंगसद्वारे डासांच्या दोन पिढ्या नष्ट करण्यात आल्या.
संशोधकांनी सांगितले की, एनोफिलिस जातीच्या डासाची मादी मलेरियाची वाहक असते. हा डास चावल्याने दरवर्षी ४ लाख लोकांचा मृत्यू होतो. दरवर्षी जगभरातील साधारणपणे २१९ कोटी लोकांना मलेरिया होतो. कोळी या किटकापासून तयार केलेला फंगस बनविण्यासाठी जेनेटि इंजिनिअरींगचा वापर केला. यासाठी ऑस्टेलियातील फनल वेब कोळीच्या विषाचा वापर करण्यात आला. फंगस डासांमध्ये पोहोताच विष काम करू लागते आणि डासांची संख्या कमी होते. कोळी कोणत्याही किड्यांना मारण्यासाठी त्यात विष सोडतो. आम्ही हीच पद्धत वापरली. प्रयोगात असे आढळले की, फंगस वेगाने डास मारते. आता जगातल्या वेगवेगळ्या भागात याचे परीक्षण केले जाणार आहे. डासांची प्रजाती नष्ट करणे हा या प्रयोगाचा उद्देश नसून मलेरिया रोखणे हा उद्देश आहे.