• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

साबण की हॅण्डवॉश ? ‘कोरोना’ला रोखण्यासाठी काय वापरायचं ?, तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या

by VaradaAdmin
September 5, 2020
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
हात धुण्यासाठी साबण जास्त प्रभावी की सॅनिटायझर?
3
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात होत आहे. या कोरोनाच्या माहामारीत आता मास्क वापरणे, सोशल डिस्टेंसिंगचेही पालन करणे आवश्यक आहे. यात साबण अतिशय उपयुक्त आणि सहज उपलब्ध होणारा आहे. त्यामुळे साबण अधिक ठिक आहे, स्वच्छतेसाठी.

मास्क लावण्याची सवय सगळ्यांनी करून घेतलीय. आता साबण, सॅनिटायजरचा वापर सर्वाधिक होत आहे. फ्रेब्रुवारीपासून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या माहामारीपासून बचावासाठी जगभरातील आरोग्यसंस्था वेगवेगळे उपाय सांगत आहे. हात धुण्याची योग्य पद्धत, गरम पाणी पिण्याचे फायदे, सॅनिटाजर लावण्याचे महत्व वारंवार पटवून दिले जात आहे.

जागतिक आरोग्यं संघटनेने ग्राफिक्स प्रकाशित केले आहे. की, यात हात धुण्याची योग्य पद्धत दाखवलेली आहे.

बोस्टनच्या नॉर्थ ईस्टर्न यूनिवर्सिटीमधील केमिस्ट्री आणि केमिकल बायोलॉजीचे प्रोफेसर थॉमस गिलबर्ट यांनी दिलेल्या माहिती अशी, त्यांच्यानुसार कोरोनाला नष्ट करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे साबण आणि गरम पाण्याने हात धुणे होय. व्हायरसचेही अनेक मेंब्रेन्स असतात, हे मेंब्रेन्स जेनिटिक पार्टिकल्सनी वेढलेले असतात. या कणांना साबण आणि पाण्याने नष्ट करता येऊ शकते. मानवी शरीरावर प्रभाव टाकत असलेल्या विषाणूच्या कॉपिवर साबणाच्या पाण्याचा परिणाम होतो. त्यामुळे विषाणूला नष्ट करता येतं

तर गिल्बर्ट यांनी सांगितले की, हात धुताना जास्त घाई करू नये. साबणाने किमान 20 सेकंद हात चोळल्यानंतर पाण्याखाली धुतले पाहिजेत. या वेळात लिपिड मेंब्रेन आणि साबणाची रासायनिक प्रक्रिया पूर्ण होते. साबण आणि पाण्याचा वापर शक्य असल्यास सॅनिटायजरचा वापर करू नये. काहीही खाण्याआधी, शौचास जाऊन आल्यानंतर हात चांगले स्वच्छ धुतले पाहिजेत. तसेच स्वच्छता बाळगली पाहिजे.

काहीजण एंटी व्हायरल हॅण्डवॉशचा वापर करतात. हा हॅण्डवॉश साबणापेक्षा अधिक प्रभाव असल्याचा समज अनेकांत आहे. पण, असे काही नाही, बाजारात उपलब्ध असलेला कोणताही साबण किंवा हॅण्डवॉश बॅक्टेरियांशी लढण्याासाठी परिणामकारक ठरतो. येत्या काळात पाण्यात अधिक प्रमाणत एंटी बॅक्टेरियल द्रवांचा समावेश असेल. तर पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

गिल्बर्ट आणि मायकेस हे दोन्ही तज्ज्ञ या गोष्टीशी सहमत आहेत की, कोरोना विषाणूशी लढण्यासाठी वापरात असलेलं पाणी योग्य गुणवत्तेचे असावे. ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासतो. अशा ठिकाणी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे कठीण असते.

जेवण बनवताना, जेवताना तसेच जेवण वाढताना हात स्वच्छ धुतले पाहिजेत. शौचास जाऊन आल्यानंतर हात धुणे गरजेचे आहे. तसेच शिंकल्यानंतरही हात स्वच्छ धुवायला हवेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी साबण अधिक फायदेशीर आहे. साबण विषाणूमध्ये असलेल्या लिपिडचा सहजपणे खात्मा करते. साबणात फॅटी अ‍ॅसिड आणि सॉल्टसारखे तत्व असतात. ज्यांना एम्पिफाइल्स म्हटले जाते. साबणातील हेच गुण विषाणूच्या बाहेरील थराला योग्यरित्या निष्क्रिय करतात.

Tags: arogyanamaarogyanama newsarogyanama updateBreakingCorona infectionCorona virusCoronavirushandwashhealthhealth newshealth updatesoapआरोग्यनामाकोरोना व्हायरससाबणहॅण्डवॉश
भुवयांच्या केस गळतीची ‘ही’ 5 कारणे प्रमुख, जाणून घ्या
सौंदर्य

भुवयांच्या केस गळतीची ‘ही’ 5 कारणे प्रमुख, जाणून घ्या

December 2, 2020
जाणून घ्या ; बाल दम्याची लक्षणे आणि उपचार
माझं आराेग्य

जाणून घ्या ; बाल दम्याची लक्षणे आणि उपचार

August 14, 2019
eat
Food

‘कोरोना’च्या काळात सकाळी उपाशी पोटी खा ‘या’ 4 गोष्टी, वाढेल रोगप्रतिकारशक्ती अन् रक्ताची कमतरता, कोलेस्ट्रॉल, मधुमेहापासून मिळेल सूटका

November 2, 2020
अशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी
माझं आराेग्य

अशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

June 8, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

2 days ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.