Skin Care Tips | उन्हाळ्यात तेलकट त्वचा होतेय?; मग ‘हे’ उपाय करा, होईल समस्या दूर

Skin Care Tips | do you suffer from oily skin in summer do these remedies and remove the stickiness on the face

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Skin Care Tips | उन्हाळ्याच्या दिवशी वाढत्या तापमानामुळे गरमी लागते. त्यामुळे माणूस त्रस्त होतो. या काळात आरोग्यावर देखील काही परिणाम होत असतो. विशेष म्हणजे त्वचावर (Skin) देखील विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे अनेकजण यावर उपाय करत असतात. उष्णता. घाम यामुळे चेहरा अधिक तेलकट होतो. त्यामुळे चिकटपणाही वाढतो. या सर्व कारणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples), ब्लिमिशेस (Blemishes) अशा समस्या (Skin Care Tips) उद्भवतात.

 

आपल्या चेहऱ्यावर काही समस्या जाणवू लागल्या की आपण लगेच घरगुती उपाय करत असतो. आपला चेहरा तेजोमय, सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. खरंतर अनेकांची मुख्य समस्या म्हणजे चेहरा तेलकट होणे हे असते. त्यामुळे यावर स्किन केअर रूटीनमध्ये दोन गोष्टींचा समावेश केला तर त्यांच्या चेहऱ्यावरील चिकटपणा निघून जाईल. अशा समस्या घालवण्यासाठी काही उपाय आहेत ते जाणून घ्या. (Skin Care Tips)

 

1. एक्सफोलिएशन (Exfoliation) –
तेलकट त्वचेवर मृत पेशी आणि घाण जमा होते, त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या सुरू होते. तुम्ही आठवड्यातून एकदा स्क्रब करू शकता. पण लक्षात ठेवा की तेलकट त्वचेसाठी स्क्रब करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्याच वेळी, तुमच्या स्क्रबमध्ये मेन्थॉल आणि युकॅलिप्टस (Menthol And Eucalyptus) असणे आवश्यक आहे. ते त्वचेला शांत आणि थंड करण्यास मदत करतात.

 

2. फेस पॅक (Face Pack) –
तेलकट त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फेस पॅकचाही वापर करणे आवश्यक आहे.
आठवड्यातून एकदा Facepack वापरून त्वचेला होणारे नुकसान टाळता येते आणि त्वचेला पोषक बनवता येते.
तुम्ही मुलतानी माती फेस पॅक (Multani Mitti Face Pack), कोरफड (Aloe Vera) आणि हळद फेस पॅक (Turmeric Face Pack),
ओटमील (Oatmeal) आणि हनी फेस पॅक (Honey Face Pack), बेसन (Gram Flour)
आणि दही फेस पॅक (Curd Face Pack) इत्यादी वापरू शकता.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skin Care Tips | do you suffer from oily skin in summer do these remedies and remove the stickiness on the face

 

हे देखील वाचा

 

Never Drink Tea After Eating Lemon And Gram Flour Food | ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यानंतर चहा अजिबात घेऊ नका; अन्यथा होईल नुकसान

Fennel-Jeera-Fenugreek-Lemon-Drinking Water | लठ्ठपणावर मात करण्यासाठी रिकाम्या पोटी ‘हे’ पाणी ‘या’ पद्धतीने प्या, जाणून घ्या

Piles Causing Foods | मुळव्याधीच्या त्रासाने त्रस्त असाल तर ‘या’ 4 गोष्टी अजिबात खाऊ नका, जाणून घ्या