• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Skin Care Tips | दह्यासोबत हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर, मिळतील ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
January 14, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, सौंदर्य
0
Skin Care Tips | benefits of turmeric and curd skin care tips

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Skin Care Tips | हळद (Turmeric) आणि दही (Curd) लावल्याने तुमच्या त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. तर, दह्यामध्ये झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि लॅक्टिक अ‍ॅसिड आढळते. या दोन्ही गोष्टी त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात आणि यामुळे चेहर्‍यावर चमक येते. (Skin Care Tips)

 

1. त्वचेवर येईल ग्लो
हळद आणि दह्याच्या वापराने त्वचेवर चमक येईल. यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियमसारखे घटक आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. दही, हळद, बेसन आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा आणि 10 मिनिटे ठेवा. काही वेळाने चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहर्‍यावर चमक येईल.

 

2. एजिंग प्रॉब्लेम होईल दूर
दही आणि हळदीच्या वापरामुळे त्वचेवरील एजिंगची लक्षणेही कमी होतात. हळद आणि दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात. दुसरीकडे, हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन सुरकुत्या दूर करते. दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि झिंकचे प्रमाण देखील त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. (Skin Care Tips)

 

एका भांड्यात एक चमचा हळद, एक चमचा दही, 1 चमचे कोरफड जेल आणि गुलाबपाणीचे काही थेंब एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. हा फेसपॅक 15 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेला चमक येईल.

3. ऑयली स्कीनच्या समस्येसाठी
ऑयली स्कीनच्या समस्येसाठी अंड्याचा पांढरा भाग दही आणि हळदमध्ये मिसळा आणि लावा. यामुळे मुरुम आणि तेलकट त्वचेची समस्या दूर होईल. हा फेसपॅक तयार केल्यानंतर 10 मिनिटे चेहर्‍यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. अंड्यामध्ये प्रोटीन आढळते, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

 

4. डागांसाठी
डाग हलके करण्यासाठी हळद, दही आणि गुलाबपाणीच्या मिश्रणात चंदन पावडर मिसळा. आता हा फेसपॅक चेहरा आणि मानेच्या भागावर लावा. फेसपॅक सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. हळदीमध्ये बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तसेच दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड देखील असते. ते त्वचेला एक्सफोलिएट करते आणि डाग कमी करण्यास मदत करते.

 

5. टॅन कमी करा
टॅनच्या समस्येवरही हळद आणि दही लावल्याने फायदा होईल. हळदीमध्ये कर्क्युमिनॉइड नावाचे पॉलिफेनॉल असते, जे त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करते.
दुसरीकडे, दही त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

 

एका भांड्यात एक चमचा हळद, एक चमचा दही आणि गुलाबजलाचे काही थेंब एकत्र करा.
ते टॅन झालेल्या भागावर लावा आणि 15 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.
यामुळे त्वचेला मॉयश्चरायझेशन राहील. हळद आणि दह्याचा फेस पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या.
हळद किंवा दहीची अ‍ॅलर्जी असेल तर ते लावू नका.

 

Web Title :- Skin Care Tips | benefits of turmeric and curd skin care tips

 

हे देखील वाचा 

Calcium Deficiency | शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची इशारा देतात ‘ही’ 7 लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Symptoms Of Irregular Periods | अनियमित मासिक पाळीने त्रस्त आहात का? ‘हे’ 5 घरगुती उपाय पडतील उपयोगी; जाणून घ्या

Sugar Patients Diet | ’शुगर फ्री’ आहेत ‘ही’ 5 फळे आणि भाज्या, तज्ज्ञांनी डायबिटीज रूग्णांना दिला खाण्याचा सल्ला

Tags: Aloe vera gelcurdfacepackhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathilatest healthlatest marathi newslatest news on healthOily skinRose waterSkinskin careskin care tipstodays health newsTurmericVitamin-Bऑयली स्कीनकॅल्शियमकोरफड जेलगुलाबपाणीदहीफेसपॅक फायदेव्हिटॅमिन-बीहळद
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021