लक्षणे
पोटात आचानक वेदना होणे, सातत्याने पोट दूखणे, जळजळ होणे, उलटी होणे, लघवीसोबत रक्त येणे यास हिमेटूरिया म्हटले जाते. वारंवार लघवी येणे ही स्टोन होण्याची लक्षणे आहेत. किडनी स्टोन असणाऱ्यांची संख्या भारतामध्ये ७० लाख आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात ही राज्य ‘स्टोन बेल्ट’ म्हणून ओळखली जातात.
हे उपाय करा
* द्राक्ष आणि तरवट बी प्रत्येकी ६ ग्रॅम घेऊन बारीक वाटावे. हे मिश्रण गरम पाण्यात ३० मिनिटे उकळावे. थंड झाल्यानंतर दिवासातून कमीत-कमी दोन वेळेस घेतल्यास स्टोनपासून सुटका मिळते.
* लघवी करताना जळजळ होत असेल तर गुळवेल आणि आवळ्याचे मिश्रण करावे. यामध्ये आदरक पाच ग्रॅम, अश्वगंधा पाच ग्रॅम टाकावे. हे मिश्रण १०० मिली लीटर पाण्यात उकळावे. हा काढा दोन दिवसाच्या आतंराने दोन महिने प्यायल्यानंतर किडनी स्टोन बरा होतो.
* दुर्वाच्या मुळ्या, अंबे हळदीचे कंद, मालकांगनीची पाने समान मात्रेत घेवून बारीक वाटावे. हे मिश्रण मधासोबत घेतल्यानंतर स्टोन बरा होतो.
* अश्वगंधा नवस्पतीचा रस प्यायल्यानंतर स्टोन बरा होतो. अश्वगंधा वनस्पतीच्या मुळ्यांचा रस व आवळ्याचा रस समप्रमाणात घ्यावा. मुत्राक्षय आणि लघवी करताना होणारा त्रास बंद होतो.
* अर्धा चमचा सौफ बारीक करून दोन कप पाण्यात पाच मिनिटे उकळावी. सौफचा चहा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यानंतर स्टोनपासून होणार त्रास बंद होतो.
* लघवी करताना त्रास होत असेल तर आवळ्याचा रस प्यायल्यानंतर त्रास होत नाही. आवळ्याचा रस, साखर आणि तुपचे मिश्रण घेतल्यानंतर स्टोनचा त्रास होत नाही.
* आवळ्याचा रस आणि इलायची याचे मिश्रण गरम करून घ्या. उलटी, चक्कर येणे, पोटात दुखणे याचा त्रास होत नाही.