जाणून घ्या- ‘डोळे लाल’ होण्याची कारणे व घरगुती उपाय

red-eyes

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बर्‍याच वेळा जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपले डोळे लाल दिसतात. डोळे लाल होण्याचं मुख्य कारण म्हणजे डोळ्यातील पांढऱ्या भागांमध्ये रक्तवाहिन्यांना सूज येणे. मात्र त्या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचे डोळे लाल होतात.

डोळे लाल होण्याची कारणे –

डोळ्यांमध्ये इन्फेक्शन
अ‍ॅलर्जीमुळेही डोळे लाल होऊ शकतात
सर्दीमुळे
अधिक काळ उन्हात राहिल्यामुळे
खराब कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे
स्क्रिनसमोर जास्त वेळ राहणं
धूळ – माती डोळ्यात गेल्याने
प्रदूषणाचा त्रास

डोळे लाल होण्यावर घरगुती उपाय –

काकडी –
काकडीमध्ये Anti-Eriteration गुणधर्मामुळे डोळ्यांतील खाज , सूज , जळजळ होते. डोळे लाल होत असतील तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा.

पाणी आणि मीठ –
पाणी उकल्यानंतर थंड करा. त्यात मीठ मिसळा. हे मीठ-पाणी कापसाने डोळ्यांवर लावा.

गुलाबपाणी –
दिवसातून २-३ वेळा स्वच्छ पाण्यात गुलाबपाणी टाकून डोळे चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे.

ग्रीन टी –
ग्रीन टी मध्ये अनेक पोषके आणि प्रतिरोधके जे डोळ्यांसाठी लाभदायक आहेत. एक चमचा ग्रीन टी ची पत्ती कोमट पाण्यात एक मिनिटासाठी टाका. त्यांनतर ते मिश्रण गाळून घ्या व फ्रीजमध्ये ठेवा. हे थंड ग्री टीचे पाणी स्वच्छ कपड्याने डोळ्यांवर लावावे.

हे सर्व उपाय करूनदेखील डोळ्यांची लालसरपणा कमी न झाल्यास नेत्र तज्ज्ञांच्या सल्ला घ्या.

टीप –
वरील लेखामध्ये दिलेल्या टिप्स फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण प्रत्येकाचा आजार आणि शारीरिक क्षमता वेगवेगळी असते.