आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लहान मुलांना ताप आला की आपण जे सिरप देतो त्यामध्ये पॅरासिटामॉल असते. यामुळे ताप उतरतो. हे औषध सुरक्षित असल्याने डॉक्टरसुद्धा देण्यास सांगतात. परंतु मुलांना हे देताना काळजी घेणे खुप आवश्यक आहे. ही दक्षता घेतली नाहीत तर याचा वाईट परिणाम बाळावर होण्याची शक्यता असते.
ही खबरदारी घ्या –
१) मुलांना पॅरासिटामॉल देताना ते १० एमजी/केजी च्या हिशोबाने द्या.
२) मुलाचे वजन १० किलो असेल तर त्याला १०० एमजी पॅरासिटामॉल द्या.
३) बाळाला आधी एखादे औषध दिले असेल तर पॅरासिटामॉलचा डोस देऊ नका.
४) बाळाला लिव्हरसंबंधी आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच द्या.
५) पॅरासिटामॉलचा डोस चार-पाच तासांच्या आत दोनदा देऊ नका.
६) हे दिल्यानंतरही तब्येत चांगली झाली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
७) पॅरासिटामॉल दिल्यानंतर बाळाला उलटी होत असेल तर ते देऊ नका.
८) बाळाचे वय ३ महिन्यांपेक्षा कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
९) बाळाच्या शरीराचे तापमान १०० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा कमी असेल तर पॅरासिटामॉल देणे टाळा.