आरोग्यनामा ऑनलाईन – समस्त ब्राह्मण समाजाच्यावतीने जुळे सोलापुरातील मोनार्क हॉस्पिटल या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोनार्क हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अरूण मनगोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात सुमारे ५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे सचिव श्याम जोशी, कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय आराध्ये, युवक शाखेचे अध्यक्ष सुनिल हरहरे, मोनार्क हॉस्पिटलचे डॉ. अविनाश कुलकर्णी, ब्रह्म प्रतिष्ठानचे सुहास देशपांडे आदींची उपस्थिती होती. या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची रक्तदाब, रॅन्डम शुगर तपासणी करण्यात आली. तसेच ईसीजीही काढण्यात आला. यावेळी डॉ. अरूण मनगोळी म्हणाले की अलिकडे आरोग्य विषयक प्रश्नांची वाढ होत आहे. विशेषत: देशात मधुमेहींची संख्या वाढत आहे.
आवडेल ते अन्न खात नाही तर जिभेला जे आवडेल ते अन्नपदार्थ खात आहे. त्यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. असा सल्लाही डॉ. मनगोळी यांनी दिला. दत्तात्रय आराध्ये यांनी सूत्रसंचालन तर सुनिल हरहरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शंकरराव कुलकर्णी, सुशांत कुलकर्णी, बळवंत अहंकारी, जयंत रायते, संजय पैठणकर, जयंत रायते, सुनील देशपांडे, अनिल जहागीरदार, गोपाळ साठे, बळवंत माढेकर, आदींची उपस्थिती होती.