आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे, व्यायामाअगोदर आणि नंतर काही चुका करणे यामुळे शारीरीक त्रास होऊ शकतो. तसेच संक्रमणसुद्धा होऊ शकते. वर्क आउट करूनही त्याचा काहीच परिणाम दिसत नसेल तर वर्कआउट नंतर काही चुका होत आहेत, असे समजावे. वर्कआउट नंतर कोणत्या चुका करु नये याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
मध्येच व्यायाम बंद करणे
वर्कआउट करतांना शरीराचे तापमान, रक्त संचार आणि हृदयाचे ठोके वाढतात. हे सामान्य होण्यासाठी थोडा वेळ लागतो. वर्कआउट करतांना मध्येच व्यायम करणे सोडु नका. हळु हळू व्यायाम करत सामान्य स्थितीमध्ये या. व्यायामानंतर हळु-हळू जॉगिंग करुन शरिराला सामान्य स्थितीत आणता येते.
स्ट्रेच न करणे
वर्कआउट नंतर स्ट्रेच केल्याने मांसपेश्यामध्ये कोणतीच समस्या होत नाही. पुढच्या दिवशी कोणतीच अडचण येणार नाही. जे लोक व्यायामानंतर स्ट्रेच करत नाही त्यांना अडचणी येऊ शकता.
व्यायामानंतर न खाने
वर्कआउट नंतर काही तरी खावे. यामुळे मासपेशींमध्ये सुधारणा होते. व्यायामा नंतर कार्ब आणि प्रोटीनयुक्त स्नॅक्स नक्की खावे. दही. ब्लूबेरी किंवा मुठभर सुखामेवा चांगला पर्याय आहे.
कपडे न बदलणे
व्यायाम केल्यानंतर लगेच कपडे न बदलने ही सुद्धा समस्या होऊ शकते. व्यायाम करतांना घामामुळे कपडे ओले होतात, जर व्यायामानंतर ते लवकर काढले नाही तर यीस्ट संक्रमण होऊ शकते.
शॉवर न घेणे
वर्कआउट नंतर शॉवर न घेणे कींवा अंघोळ न करणे यामुळे त्रास होऊ शकतो. व्यायामानंतर घाम वाळतो आणि यामुळे जीवाणु वाढतात. संक्रमणापासुन त्वचेला वाचवण्यासाठी शॉवर घेणे आवश्यक आहे.
अल्कोहोल सेवन
व्यायामानंतर अल्कोहोल घेवू नका. वर्कआउट नंतर लगेच अल्कोहोल प्यायल्याने शरीर डीहायड्रेट होऊ शकते. यामुळे वर्कआउट नंतर खुप पाणी प्या.
कमी झोपणे
व्यायामासाठी भरपूर झोप आवश्यक असते. जर तुम्ही व्यायाम करत आहात तर कमीत-कमी ७-९ तास झोप घ्या.