वजन कमी करण्याचा खास उपाय ! केळी आणि गरम पाणी
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. परंतु, कधीकधी चूकीच्या पद्धतीमुळे आहारात विविध बदल केल्याने नुकसानच होत असते. यासाठी कोणताही उपाय करताना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. वजन कमी करण्यासाठी केळी आणि गरम पाण्याचा उपाय केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. या आहारास ‘मॉर्निंग बनाना’ असे म्हटले जाते.
या उपयामुळे शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो आणि पचनक्रियाही वाढते. केळीमध्ये एक प्रकारचा स्टार्च असल्याने ग्लायसेमिक इंडेक्सची मात्रा फारच कमी असते. यामुळे ते पचण्यास जास्त वेळ लागतो. तसेच बऱ्याच वेळेपर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे ऊर्जादेखील मिळते. वजन कमी करण्यासाठी रात्री लवकर जेवण केले पाहिजे. तसेच जेवणानंतर गोड खाऊ नये. वजन करण्यासाठी सकाळच्या नाश्ता घेताना एक अथवा जास्त केळी खावीत.
शक्यतो पोट भरल्यासारखे वाटले पाहिजे. त्यांनर एक ग्लास गरम पाणी घ्यावे. दुपारच्या जेवणात ताज्या सलाडसोबत जेवण घ्यावे. भूक लागल्यावर ३ च्या आधी काही गोड खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात भरपूर भाज्या खाव्यात. गोड खाणे टाळावे. केळी खाताना गरम पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची समस्या दूर होते. सकाळी उपाशीपोटी गार पाणी प्यायल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते, असे काहींना वाटते. मात्र, तसे नसून यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम हळू होते आणि वजन कमी होत नाही.