आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी ‘लिपस्टिक’ फार महत्वाची भूमिका बजावते. लिपस्टिक हा दैनंदिन मेकअपचा भाग झाला आहे. मात्र हीच लिपस्टिक लावताना जराही फसली तरीही पूर्ण मेकअप बिघडू शकतो.
व्यवस्थित लिपस्टिक लावण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.
लिपस्टिक अधिक वेळापर्यंत टिकावी अशी इच्छा असेल तर तिला फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवलेली लिपस्टिक लावल्याने ती अधिक काळ टिकते.
लिपस्टिक खरेदी करताना चांगली कंपनी निवडा.
ओठांवर मृत त्वचा वारंवार येत असते. ही मृत त्वचा पूर्णपणे काढून ओठांची त्वचा मुलायम करा. ही त्वचा काढण्यासाठी दात घासण्याच्या ब्रशवर थोडं व्हॅसलिन लावा आणि ओठांवर हलकेसे घासा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ ओठांवर राहण्यास मदत होईल.
लिपस्टिक लावण्याआधी प्रायमर म्हणून मॉइश्चरायझर किंवा फाउंडेशन ओठांवर लावा. हे फाउंडेशन थोडावेळ ओठांवर ठेवा. काही वेळानं हे प्रायमर हळूहळू पुसून टाका. यानंतर ओठांवर लिपस्टिक लावा.
लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप पेन्सिल अप्लाय करा. लिप पेन्सिल ओठांच्या मध्ये आणि खालील बाजूला लावून पूर्ण ओठांवर मिक्स करा.
लिपस्टिकचा पहिला कोट लावल्यानंतर ओठांमध्ये टिशू पेपर दाबा. यामुळे अतिरिक्त लिपस्टिक निघून जाईल आणि लिपस्टिक पसरण्याचा धोका टळेल.