तणावग्रस्त महिलांना मासिक पाळीत होतो जास्त त्रास
आरोग्यानामा ऑनलाइन टीम – ज्या महिला सतत तणावाखाली असतात त्यांना मासिक पाळीदरम्यान अधिक त्रास सहन करावा लागतो. तर तणावाखाली अजिबात नसलेल्या महिलांना या काळात जास्त त्रास होत नाही. हॉर्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष मांडला आहे. तणावामुळे हार्मोनल असंतुलन होते. हा त्रास दूर करायचा असल्यास नियमित व्यायाम लाभदायक आहे. तणावामुळे महिलांना विविध प्रकारचे त्रास सुरू होऊ शकतात. तसेच पुरूषांनाही यामुळे अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो.
अधिक चिंता व तणावामुळे पोटदुखीची शक्यता होऊ शकते.
डोकेदुखी, पाठदुखी व निद्रानाश असेही त्रास होतात. संशोधकांनी १९५३ पुरुष व महिलांवर केलेल्या संशोधनात असे आढळले की, जास्त ताण घेतल्याने पोटदुखीची शक्यता तिप्पट वाढते. मेंदू व आतडे एकाच नर्व्ह पाथवेचा वापर करतात. त्यामुळे तणाव निर्माण झाल्यावर मेंदू जशी प्रतिक्रिया देतो तोच सिग्नल आतडे पकडतात. अशा वेळी व्यायाम व ध्यानधारणा परिणामकारक ठरू शकते. ताण आल्यावर शरीर अनेक लक्षणांच्या माध्यमातून सूचित करते. मात्र, अनेकांन ते समजत नाही. ही लक्षणे ओळखणे आणि योग्य उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे.दात व हिरड्यांत दात खाण्याच्या सवयीमुळे वेदना होऊ शकतात. ते तणावग्रस्त असल्याचे मुख्य लक्षण आहे.
अशा स्थितीत तातडीने दंतचिकित्सकांशी संपर्क साधायला हवा. स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल सक्रिय झाल्याने शरीराची प्रतिकारक्षमता कमकुवत होते. त्यामुळे जिवाणू सहज हिरड्यांवर आक्रमण करतात. अशा स्थितीत हिरड्यांतून रक्त येणे, हिरड्या कमकुवत होणे वा दातांची पकड ढिली होणे अशा समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे तणावरहित राहण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि भरपूर झोप अवश्य घ्यावी.तणावामुळे त्वचा कोरडी होणे, पुटकुळ्या येणे वा त्यास खाज येणे असे त्रास होऊ शकतात. हार्मोनल बदलांमुळे असे होते. मात्र, सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यानंतर काही आठवड्यांनी जर वरील लक्षणे कमी झाली नाहीत तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तणावामुळे नर्व्ह फायबर्स सक्रिय होतात. त्यामुळे दाह वा खाज येऊ शकते. तणावग्रस्त झाल्यानंतर सक्रिय होणारा स्ट्रेस हार्मोन आयजीई नावाच्या प्रथिनाच्या निर्मितीस चालना देतो. हे प्रथिनच प्रत्यक्षात अँलर्जीस कारणीभूत असते.