आरोग्यनामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यापासून वाचण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाय करण्यात येत आहेत. त्याचबरोबर स्वतःसह आपल्या घराची विशेषःता किचनची सफाई करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या उपचारात ‘हा’ देशी उपाय आणखी वाढवतोय धोका, डॉक्टरांनी केले सावध (Video)
किचन ओटा-
किचन ओट्यावर बहुताश वेळा विविध वस्तू ठेवल्या जातात. पण काही महिला किचन ओट्यावर भाज्या कापतात. त्यामुळे किचन ओट्यावर किटाणू राहण्याची भीती असते. त्यासाठी दररोज किचन ओटा साफ करणे आवश्यक आहे. सर्फच्या पाण्याने किचन ओटा साफ करावा. त्याला पुसण्यासाठी वेगळे कापड ठेवावे.
सिंक-
सिंकमध्ये खराब भांडे धुण्यासाठी ठेवली जातात, पण भांड्यासोबत दररोज सिंकदेखील साफ करणे गरजेचे आहे. भांड्यातील तेल त्यावर पडलेले असते. त्यामुळे त्यावर किटाणू असण्याची शक्यता असते. त्यामुळे भांडी धुतल्यानंतर सिंक साफ करणे गरजेचे आहे. गरम पाणी आणि बेकिंग पावडरने सिंक साफ करणे गरजेचे आहे.
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ पद्धतीने करा मुगडाळीचे सेवन, जाणून घ्या
कपडा-
किचनमध्ये काम करीत असतांना आपण जो कपडा वस्तू साफ करण्यासाठी वापरतो तो देखील साफ करणे गरजेचे आहे. कारण त्यातील किटाणूमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. साबण किंवा डेटॅालने हा कपडा साफ करावा.
सतत गोड खाण्याची इच्छा शांत करण्यासाठी ‘या’ 4 ‘टिप्स’ अँड ‘ट्रिक्स’ची घ्या मदत, जाणून घ्या
फ्रिज-
दररोज आपण फ्रिजचे उघडतो आणि बंद करीत असतो. त्यामुळे आपल्या हातावरील किटाणू त्याला चिपकण्याची भीती असते. त्यामुळे २ ते ३ दिवसानंतर फ्रिज साफ करणे महत्वाचे आहे. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात मीठ आणि बेंकिंग सोडा टाकून त्याच्या मिश्रणात कपडा बुडवून फ्रिज साफ करावे.
Covid vaccination : व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आणि नंतर करू नयेत ही कामे, जाणून घ्या युनिसेफची गाईडलाईन
कचरापेटी-
कचरा पेटीतील पिशवी दररोज बदलावी, कचरा पेटी सर्फ किंवा डेटॅालने धुवावी.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
कोरोनाकाळात ‘जलनेती’ ठरते अतिशय उपयुक्त, जाणून घ्या
मलायकाची ‘मॉर्निंग कॉकटेल’ रोग प्रतिकारशक्ती वाढवेल, जाणून घ्या उपाय आणि त्याचे फायदे