१) पुरुषांमध्ये वंध्यत्वाची कारणं म्हणजे कमी प्रमाणात तयार होणारे शुक्राणू (Sperms) किंवा शुक्राणूंना बाहेर पडण्यास होणार अडथळा.
२) हार्मोनमध्ये झालेल्या बदलांमुळे पुरुषांच्या शरीरात कमी प्रमाणात शुक्राणू तयार होतात. तसंच थायरॉईड, पिट्युटरी ग्रंथी किंवा वीर्य उत्पादन करणाऱ्या ग्रंथींमध्ये काही बिघाड झाल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते.
३) अनेक पुरुष दारू, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे त्यांच्यात वंध्यत्व येऊ शकते.
४) काही पुरुषांना तरुण वयातच मधुमेहाचा त्रास आणि उच्च रक्तदाब व त्या औषधांचे दुष्परिणाम यामुळे कमी होणारे शुक्राणुंचे प्रमाण. यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
५) अंडकोश, प्रोस्टेट व सेमिनल व्हेसिकल या तीन ग्रंथींमधील द्रव्यांचा संयोग वीर्यात असतो. यातील एखाद्या किंवा तिन्ही ग्रंथीमध्ये संसर्ग किंवा आजार असू शकतो. सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस (एसटीडी), टयूबरक्युलॉसिस (टीबी), कलायमेडिया हा संसर्ग पुरुष वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरतो.