आरोग्यनामा ऑनलाइन टीम : हातांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना नष्ट करण्याची ताकद असते. शास्त्रामध्ये हस्त मुद्रांचे ज्ञान आहे. या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या हस्त मुद्रेविषयी. ही मुद्रा केल्याने मूळव्याध तसेच युरिनच्या काही समस्यांमध्ये आराम मिळतो. हातावर शरीराच्या खास भागासाठी काही विशेष प्रेशर पॉईंट असतात. या ठिकाणी प्रेशर दिल्यास चमत्कारिक फायदे होतात. हस्त मुद्रांच्या माध्यमातून असाच उपचार केला जातो.
तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगरवर दररोज कमीत कमी २-३ वेळेस ६० सेकंद प्रेशर द्यावे. या ठिकाणी हलकेसे प्रेशर दिल्यास बद्धकोष्ठता दूर होते. यासोबतच पोटाशी संबंधित विविध आजार औषध न घेता ठीक होतात.अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकत्र करून केवल मुद्रा केल्यास बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात लाभ होतो. यासोबतच वाढलेले वजन कमी होते.आयुर्वेदानुसार आपल्या हाताचे पाचही बोट एका विशेष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा -अग्नी तत्व, तर्जनी – वायू तत्व, मधले बोट -आकाश तत्व,अनामिक-पृथ्वी तत्व, करंगळी – जल तत्व, ही ती विशेष तत्व होय.