हे आसन नियमित केल्याने शरीरात जवानी आणि चेहर-यावर चमक येते. हे आसन भगवान शंकराचे प्रमुख आसन असल्याने यास नटराजन आसन म्हणतात. नटराजन आसन करण्यासाठी दोन्ही पाय जुळवून उभे राहा. यानंतर डाव्या पायावर भार देऊन तोल सावरत उजवा पाय सावकाश मागच्या दिशेने वर उचला. आता उजवा हात मागे नेऊन उजवा पाय पकडा. शरीराची स्थिती ठेवा. सामान्य श्वास उच्छ्वास चालू राहू द्यावा. काही काळ या स्थितीत स्थिर राहा. नंतर दुसर-या पायावर हेच आसन करावे.
हे आसन नियमित केल्याने हातापायाच्या स्रायूंचा विकास होतो. स्रायू सुदृढ होतात. शरीरावर नियंत्रण येते. मनाची एकाग्रता वाढते. निर्णयक्षमता वाढते. आत्मीक शांती मिळते. जवानी टिकून राहते. या आसनाच्या नियमीत सरावाने म्हातारण आणि आजार दूर राहते. शिवाय सौंदय वाढते आणि टिकून राहते.