मीठ शरीरारासाठी वाईट, असे म्हणतात; जाणून घ्या सत्य

salt

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : जेवणाची चव राखण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. पूर्वी जाडे मीठ सर्रास वापरले जात होते. आता आयोडिनयुक्त बारिक मीठ वापरले जाते. भारतात तर मोठमोठ्या कंपन्या मीठाच्या व्यवसायात उतरल्या आहेत. यावरून मीठाला किती मागणी आहे, हे दिसून येते. मीठ जेवणाची रूची वाढवत असले तरी मीठ शरीरासाठी वाईट असते, असे म्हटले जाते. यामुळे अनेकांच्या मनात कायम संभ्रम निर्माण झालेला असतो. खरे तर मीठ खाण्यात वाईट काही नाही. मात्र, चुकीच्या प्रमाणात मीठ खाल्ले तर मात्र त्रास होऊ शकतो. योग्य प्रमाणात मीठाचे सेवन करणे शरीरासाठी चांगले आहे. चयापचय क्रियेत मीठाची महत्त्वाची भूमिका असते.

मीठामुळे शरीराची आद्र्रताही टिकून राहते. त्यासाठी योग्यप्रमाणात मीठाचे सेवन केले पाहिजे. शरीरासाठी मीठाचे प्रमाण कमी किंवा अधिक झाले तर संतुलन बिघडून जाते. अनेक आजार यामुळे होऊ शकतात. जास्त मीठ खाल्लयाने उच्च रक्तदाब आणि त्वचारोग होऊ शकतात. निसर्गात मीठाचे किमान २५ प्रकार आहेत. यातील चुना, आयोडीन, गंधक, कॅल्शियम, फॉस्फोरस, क्लोरिन आदी शरीरासाठी आवश्यक असतात. हे सर्व घटक हिरव्या पालेभाज्यांतून सुद्धा मिळतात. त्यामुळे कृत्रिम किंवा बाहेरून कमी मीठ खाणे नेहमी टाळले पाहिजे.

मीठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तहान जास्त लागते. शिवाय, विविध आजारावरही याचा परिणाम होतो. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतोच. तसेच केसही झडू लागतात. यामुळे टक्कल पडते.जास्त मीठ सेवन केल्याने विविध प्रकारचे नुकसान होते. यामुळे अनिद्रेला सामोरे जावे लागते. तर कमी मीठ खाल्लयाने चांगली झोप लागते. अधिक मीठ खाल्लयाने वातजन्य आजार होतात. महिलांनी गर्भावस्थेत कमी मीठ सेवन केले पाहिजे. यामुळे अनेक आजार दूर राहातील. जास्त मीठ खाल्ल्याने लठ्ठपणाचा सुद्धा त्रास होऊ शकतो. यामुळे आहारात योग्यप्रमाणात मीठाचा वापर केला पाहिजे.