• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

‘तिने’ डाऊन सिंड्रोमचाही केला पराभव

by Nagesh Suryawanshi
April 4, 2019
in ताज्या घडामाेडी
0
Manali Shelke
0
VIEWS

पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – पुण्यात राहणाऱ्या २० वर्षीय मनाली शेळकेने दुबईला झालेल्या विशेष ऑलिम्पिकमध्ये पॉवर-लिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. ती डाऊन सिंड्रोमने ग्रस्त आहे. या आजारावर मात करत तिने हे यश संपादन केलं आहे. मनालीचे अनेकांनी कौतूक केल्याने सध्या तिचा आनंद द्विगुणित झालाय. मेडल जिंकल्याच्या आनंदापेक्षा कौतुकाने तिचा आनंद अधिक वाढला आहे. मनालीने फक्त गोल्ड मेडलचं न्वहे तर त्यासोबत तिने तीन ब्राँझ मेडल्सही पटाकावत देशाचं नाव उंचावलं आहे.

मनालीला खेळ खेळण्याची आवड असून तिने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर थेट विशेष ऑलिम्पिकच्या ४ पदकांना गवसणी घातली आहे. तिच्या या जिद्दीपुढे डाऊन सिंड्रोमला देखील हार पत्करावी लागली आहे. मनालीचे पालक म्हणतात, इतर पालकांप्रमाणे आम्ही देखील मुलीला डाऊन सिंड्रोम आहे या विचाराने तिच्या जन्मानंतर जवळपास २ वर्ष चिंतेत होतो. आमच्यासमोर मनालीचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न होता. मात्र त्यानंतर आम्ही आहे ती परिस्थिती स्विकारायचं ठरवलं.

त्यानुसार मनालीला पुण्यातील कामायनी या विशेष मुलांच्या शाळेत घातलं. लहानपणापासूनच मनालीला टीव्ही लावून डान्स आणि खेळ पाहण्याची आवड होती. त्यामुळे आम्ही तिला कथकचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. मात्र कथकसाठी तिसऱ्या वर्षी लेखी परिक्षा असल्याने मनालीला ते जमणं शक्य नव्हतं. त्यानंतर मनालीच्या शिक्षकांनी आम्हाला ती जीममध्ये डंबेल्स उचलून देत असल्याचं सांगितलं. आणि त्यानंतर आम्ही तिला पॉवरलिफ्टींगमध्ये प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. त्यानुसार २०१७ मार्च पासून तिला यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर मनाली खेळली आणि तिची विशेष ऑलिम्पिकमध्ये निवड करण्यात आली.

डाऊन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या मुलांकडे अजूनही पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो. मात्र मनालीने तिच्या कर्तृत्वाने अशा मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला आहे. ही मुलं देखील इतर मुलांप्रमाणे काम करू शकतात, खेळू शकतात हे तिने समाजाला पटवून दिलं आहे. या मुलांना फक्त कौतुकाची थाप हवी असते आणि त्यातच त्यांचा आनंद असतो. त्यामुळे ज्या मुलांना डाऊन qसड्रोम आहे अशा मुलांच्या पालकांनी त्यांना समाजापासून दूर ठेऊ नये. त्यांना इतर मुलांप्रमाणे वागवलं पाहिजे.

Tags: arogyanamaDown SyndromeGold medalhealthpuneआरोग्यआरोग्यनामागोल्ड मेडलडाऊन सिंड्रोमपुणे
Previous Post

वजन कमी करायचंय ? हा डाएट प्लॅन फॉलो करा

Next Post

उन्हाळ्यात व्यायाम करताना ही काळजी घ्या

Next Post
उन्हाळ्यात व्यायाम करताना ही काळजी घ्या

उन्हाळ्यात व्यायाम करताना ही काळजी घ्या

kale
माझं आराेग्य

‘हि’ पालेभाजी खाल्ल्याने तुमच्या शरीराला होऊ शकतात हे फायदे; Health benefits of Kale

by omkar
February 26, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- आरोग्यनामाची हि पोस्ट आणखी एका सुपरफूड बद्दल आहे - काळे! ही भाजी कोबीच्या कुटूंबाची आहे. ब्रोकोलीप्रमाणे, काळे पोषक...

Read more
acne

7 अनपेक्षित मुरुमांवरील ब्रेकआउट ट्रिगर (झोप निभावते महत्त्वपूर्ण भूमिका ) Acne Skin

February 25, 2021
pregnancy

5 शीर्ष गर्भधारणेचे उपाय जे तुम्हाला आकारात परत येण्यासाठी मदत करतील; 5 Pregnancy Remedies to get back in shape

February 25, 2021
viral infections

बदलत्या हवामानात वाढलाय वायरल इन्फेक्शनचा धोका ! ‘ही’ लक्षणं दिसल्यास व्हा सतर्क, ‘या’ 5 टिप्सने स्वत:ला ठेवा सुरक्षित

February 25, 2021
Hritik Roshan transformation

हृतिक रोशनचा फिटनेस मंत्र: ‘वॉर’ चित्रपटातील कबीर कसा फिट राहतो ते येथे पहा

February 25, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.