धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

kavti

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : स्मार्ट फोन वापरण्याचे जेवढे फायदे आहेत त्यापेक्षा जास्त त्याच्या अतिवापराचे तोटे आहेत.आजकाल सर्वच वयोगटातील व्यक्ती मोबाइल फोन वापरताना दिसतात. अगदी शाळकरी मुलांनाही सुरक्षेच्या कारणास्तव काही पालक मोबाइल फोन देतात. कॉलेजचे युवक आणि युवती तर तासनतास मोबाइलला चिकटलेले असतात. या मोबाइलमुळे शरीराचे कोणकोणते नुकसान होते, याबाबत अनेकांना माहितीही नाही.

हे माहित नसल्याने अगदी लहान बाळांच्याही कानाला मोबाइल लावणारे पालक आहेत. शिवाय काहीजण मुलांना खेळण्यासाठीही मोबाईल देतात. मोबाईलच्या अतिवापराने ब्रेन कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. तसेच आता नवीन संशोधनात समोर आलेली माहिती तर अतिशय धक्कादायक आहे.

वॉशिंगटन पोस्टच्या वृत्तानुसार सध्या मानवाच्या कवटीमध्ये शींग उगवत असल्याचे आढळून आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सनशाईन कोस्ट, ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासकांनी हे संशोधनक केले असून त्यांनी म्हटले आहे की, स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्सचा अतिवापर केल्याने मनुष्यांना हा विकार होत आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, फोनचा अतिवापर केल्याने मनुष्यांच्या कवटीमध्ये शिंगासारखे काहीतरी उगवत आहे. पुढच्या बाजूने वाकून फोनचा वापर केला जात असल्याने स्पाईनचे वजन डोक्याच्या मागच्या मसलवरवर पडत आहे. त्यामुळे तेथील चामडी जाड होऊन तंतुग्रंथीमध्ये बदल होऊ लागला आहे.