‘केस’ धुताना घ्या ही काळजी
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – रोजच्या धावपळीच्या जीवनात मुलींना केसांची काळजी घ्यायला अजिबात वेळ नाही. त्यामुळे मुलींचे केस चांगले असले तरी त्यांची योग्य निगा न राखली गेल्यामुळे केस खराब होतात. आणि मुलींचं खरं सौंदर्य तर केसांमध्ये असत. त्यामुळे मुलींना केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मुलींनी केस धुवायच्या आधी जर काही घरगुती उपाय केले तर त्यांचे केस अधिक सुंदर होतील.
केस धुवायच्या आधी वापरा या टिप्स
१) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घ्या. आणि हे एकत्र पाण्यात उकळव. त्यात थोडा कापूर टाका. हे पाण्याने जर डोके धुतले तर केस चांगले होतात.
२) चहा करून उरलेली चहा पावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून त्यात लिंबचा रस टाका. या पाण्याने केस धुवा.
३) कडुनिबांची काही पाने पाण्यात उकळुन त्याने केस धुतले. तर केस मजबुत होतात.
४) कोरफ़ड जेलने केसांना मसाज केल्यास केस गळत नाहीत.
५) शिकेकाई पाण्यात उकळुन याने जर केस धुतले तर केस चमकदार होतील.
६) १०० ग्रॅम मेहंदी पावडर घ्या. त्यात १ चमचा चहा पावडरचे पाणी उकळुन त्या मिश्रणात १ चमचा कॉफ़ी पावडरचे पाणी उकळुन त्यात १ चमचा काथा पावडर त्यात घालावी. ही मेहंदी केसांना २ तास ठेवावी. केस सोनेरी रंगाचे आणि मुलायम होतील.
७) कोरड्या केसांना मेहंदी, बदाम, एरंडेल तेल व तिळाचे तेल लावावे. त्यात स्निग्धपणा अधिक असतो. त्यातील एखादे तेल गरम करून लावावे. त्यानंतर जर केस धुतले तर त्याचा केसांना फायदा होतो.
८) केस धुवायच्या आगोदर केसांना कोरफड लावा. आणि नंतर केस धुवा केस मऊ होतील.