आरोग्यानामा ऑनलाईन टीम : डोकेदुखी ही सामान्य समस्या असली तरी तिचा त्रास अनेकांना वारंवार होत असतो. डोकेदुखीवर उपचार करण्यापूर्वी त्यामागील कारणे माहित असणे खुप गरजेचे आहे. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार करणे महागात पडू शकते. डोकेदुखीची कारणे आणि प्रकार आपण जाणून घेणार आहोत. तसेच यावर कोणते घरगुती उपाय करावेत, याची माहिती घेवूयात.
ही आहेत प्रमुख कारणे
1 लो ब्लड सर्कुलेशन
डोक्यामध्ये कमी रक्त पुरवठा झाल्यावरही डोकेदुखी होऊ शकते. दिवसातून केवळ 10 ते 15 मिनिटे ध्यान लावून बसल्यास रक्तप्रवा सुरळीत होऊ शकतो.
2 कमी झोप
झोप पूर्ण न होणे हे डोकेदुखीचे कारण ठरु शकते.
3 गोंधळ गडबड
मोठा आवाज, कर्णकर्कश आवाज काहींना सहन होत नाही. यामुळे डोकेदुखी होते.
4 फोनवर जास्तवेळ बोलणे
फोनवर जास्तवेळ बोलण्याने हा त्रास वाढू शकतो.
5 प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे
सतत विचार करण्यानेही डोकेदुखीची समस्या होते. यामुळे मेंदूवर ताण येतो.
6 तणाव
तणाव वाढल्यास डोकेदुखी होऊ लागते. ध्यान लावून बसल्याने तणाव दूर होतो.
7 मन, शरीराचा थकवा
शरीरासोबत मनावरील थकवा वाढतो तेव्हा दोन्हीमुळे डोकेदुखी होते.
8 असंतुलित शारीरिक तंत्र
पोट खराब असल्यास डोकेदुखी होते. शरीराचे वेगवेगळे अंग एकमेकांशी जुळलेले आहेत. त्यामुळे एका भागात कोणतेही असंतुलन अन्य भागाला प्रभावित करते.
Visit : arogyanama.com