सांधेदुखीतून मुक्त व्हा, करा घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन – सांधेदुखी हा त्रास अलिकडे सर्वच वयोमानातील व्यक्तींना जाणवू लागला आहे. शरीरातील यूरिक अ‍ॅसिडमुळे ३० वर्ष वयानंतर हा आजार होतो. यूरिक अ‍ॅसिड हे ब्लड सक्र्युलेशनने किडनीपर्यंत पोहचते आणि युरीन मार्गे बाहेर जाते. मात्र हेच युरीक अ‍ॅसिड बाहेर न पडल्यास वाढते व ते शरीरात गाठ सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इतर भागात पसरते आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.

हा त्रास कमी करण्यासाठी केळे खूप उपयोगी ठरते. दिवसातून कमीत कमी २ केळी खाल्ल्यानेही युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते. डाएटमध्ये फळांचा समावेश केल्याने रक्तप्रवाहामध्ये तयार झालेले युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते. युरिक अ‍ॅसिडने पिडीत असलेल्यांनी फळांचा ज्यूस पिणे लाभदायक आहे. फरसबीपासून काढलेला रस युरिक अ‍ॅसिडच्या रोगासाठी घरगुती उपाय आहे. दिवसातून दोनवेळा फरसबीचा रस पिल्याने युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते. युरिक अ‍ॅसिडच्या त्रासामध्ये पथ्य खूप आहे. यामुळे वर्ज पदार्थांची यादी मोठी आहे.

यामुळे ही व्याधी झालेले पथ्य सोडतात आणि व्याधी वाढवून घेतात. परंतु, असे अनेक चविष्ट पदार्थ आहेत जे युरिक अ‍ॅसिड कमी करतात. यामध्ये हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. युरिक अ‍ॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. वात विकारांमध्ये युरिक अ‍ॅसिडचा त्रास समाविष्ट असला तरी गरम पाण्याचे सेवन टाळावे. सुंठ, वावडिंग, पिंपळी घालून उकळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.