आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कुरळे केस (Curly hair) सुंदर दिसतात. परंतु त्यांची काळजी घेणे आणि हाताळणे थोडे अवघड आहे. आपल्याला कुरळे केस (homemade 3 hair mask for curly hair) हाताळण्यास त्रास होत असेल तर आपण केस धुण्यापूर्वी हेअर मास्क (Hair mask) लावू शकता. यामुळे केसांना पोषण मिळेल आणि आतून बळकट होतात. केसांचा कोरडेपणा कमी होईल आणि बराच काळ ओलावा टिकून राहील. आपले केस सुंदर, कोमल आणि चमकदार दिसतील. नैसर्गिक गोष्टींनी तयार केलेले हे हेअर मास्क लावल्यास केसांना कोणतीही हानी होणार नाही. homemade 3 hair mask for curly hair
१) कोरफड जेल मास्क (Aloe gel mask)
यात एंटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. कोरफड (Aloe) लावल्यास मुळांपासून केसांचे पोषण होते. केस आणि टाळूची चांगली स्वच्छता होते.
कसे वापरायचे
यासाठी केसांच्या लांबीनुसार कोरफड जेल घ्या आणि हलक्या हातांनी टाळूवर मालिश करा. नंतर ते संपूर्ण केसांवर लावा आणि १५ मिनिटांसाठी तसेच सोडा. नंतर प्रथम कोमट पाण्याने केस धुवा. नंतर सौम्य शैम्पू वापरा.
२) अंडी आणि अंड्यातील बलक मास्क (Eggs and egg yolk mask)
अंडी (Eggs) आणि अंड्यातील बलक केसांना पोषण करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. हे केस मुळापासून अधिक मजबूत बनवेल यामुळे आपले कुरळे केस आणखी सुंदर दिसतील.
कसे वापरायचे
यासाठी, एका भांड्यात १ अंडे फोडून घ्या.
नंतर १ चमचा अंड्यातील बलक आणि २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करावे आणि मिश्रण केसांच्या मुळांवर लावून संपूर्ण केसांवर लावा.
१ तासानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.
३) एवोकाडो आणि दही मास्क (Avocado and curds mask)
केसांना बळकटी आणि सरळ करण्यासाठी आपण एवोकाडो (Avocado) आणि दही (curds) हेअर मास्क देखील लावू शकता.
हे टाळूचा कोरडेपणा काढून टाकून ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल.
कसे वापरायचे
यासाठी १ एवोकाडो बारीक करून आवश्यकतेनुसार पाणी आणि दही घाला.
१ तास तयार मिश्रण लावा. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.
Wab Title :- homemade 3 hair mask for curly hair
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Woman Care | जर ‘मेनोपॉज’ येणार असेल तर काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या
Health Tips | उन्हाळ्यात सफरचंदासारख्या ‘या’ फळाच्या सेवनाने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे; जाणून घ्या