आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चुकीची जीवनशैली, खाण्या पिण्याच्या सवयी, यामुळे केस गळणे कोरडेपणा ही सामान्य समस्या झाली आहे. मुली यासाठी महागडे शाम्पू सिरम आणि इतर गोष्टी वापरत असल्या तरी त्यातून त्यांना विशेष फायदा मिळत नाही. अशा वेळेस आपण केसांशी (hair) संबंधित समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ शकता. होय, पौष्टिक समृद्ध कोरड्या फळांचा बनलेला अक्रोड मास्क केसांच्या प्रत्येक समस्येवर उपचार करणारा आहे.
-साहित्य
अक्रोड – १० ते १२
दही – १ कप
लिंबाचा रस –१ चमचा
गुलाब पाणी – १ चमचा
-कसे बनवावे
हेअर hair मास्क तयार करण्यासाठी १ तास अक्रोड पाण्यात भिजवा. आता हे मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या. नंतर दही, अक्रोड पेस्ट, लिंबाचा रस, आणि गुलाब पाणी घ्या आणि चांगले एकजीव करा .आपला हेअर मास्क तयार आहे.
-असे लावा
केसांचे hair दोन भाग करा. हे मिश्रण मुळाशी लावा. हेअर मास्क लावण्यापूर्वी तपासून बघा केस तेलकट नसावे. टाळूवर हेअर मास्क लावल्यानंतर शाॅवर कैपने डोके झाकून घ्या. ३०मिनिटांनी केस धुवा पण त्यावेळी शाम्पूचा वापर करू नका.केस कोरडे झाल्यावर अक्रोड तेल लावा.दुसऱ्या दिवशी शाम्पूने केस धुवा.आठवड्यातून एकदा या हेअर मास्कचा वापर करा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या
Wab Title : diy walnut hair mask for dandruff and hairfall