आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदात असंख्य औषधी वनस्पतींचे तोडगे सांगीतले आहेत. अशीच एक अतिशय गुणकारी वनस्ती म्हणजे गुळवेल होय. संस्कृतमध्ये गडूची, अम्रतवल्ली अथवा अमृता तर गुजरातीमध्ये गिलो या नावाने गुळवेल ओळखली जाते. याला नमि गडवेल असेही म्हणतात. कडूलिंबाच्या झाडवर ही वनस्पती वाढते. गुळवेल सर्वश्रेष्ठ औषधी आहे. सुमारे डझनभर आजारांवर गुळवेलचा रामबाण औषध म्हणून वापर केला जातो.
टायफाईड, मलेरिया, डेंगू, अॅलिफेंटिएसिस, विषमज्वर, उल्टी, बेशुद्धी, खोकला, कावीळ, अॅलर्जीसह त्वचा तसेच कृष्ठ रोगासारख्या आजारांवर गुळवेल रामबाण औषधी आहे. शरीरात इन्सुलिन निर्माण करण्याची क्षमता अधिक असते. गुळवेलमध्ये एल्केलाइड गिलोइन नामक ग्लूकोसाइड, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टरोल, अम्ल व उडनशील तेल आढळते. गुळवेलच्या पानांत कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस असते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुळवेल एक उत्तम औषध असून ती सर्वोत्तम अॅटीबायोटिक सुद्धा आहे. गुळवेलमध्ये ताप कमी करण्याचा अद्भुत गुण असून गुळवेल मलेरियावर अधिक प्रभावी औषध आहे.
गहू अथवा ज्वारीच्या रसासोबत तसेच तुळशीच्या पानांच्या रसासोबत अथवा कडू लिंबाच्या पानांसोबत गुळवेल सेवन केल्याने कर्करोगासारखे आजार बरे होतात. मिरगी आजारावरही गुळवेल गुणकारी आहे. प्राण्यांसाठी गुळवेल एक संजीवणीच आहे. गुळवेलच्या मुळात शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असते. कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी ते फायदेशीर असते. कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळवेल गुणकारी आहे.