चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक

face

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिला आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेतात. जर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्यातर त्यासाठी बाजारात उपलब्ध अनेक अँटी एजिंग क्रीमचा वापर केला जातो. परंतु , या क्रीम्स खूपच महाग असतात. शिवाय या क्रीम्समध्ये केमिकल असल्याने त्याचा परिणाम दिर्घकाळ टीकत नाही. शिवाय काही दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून घरच्याघरी अँटी एजिंग फेस पॅक तयार केले तर ते अधिक चांगले आहे. शिवाय, या फेसपॅकमुळे तुम्ही तरुण दिसू शकता.

घरच्याघरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून अँटी एजिंग फेस पॅक बनविण्यासाठी एक केळे, एक अंडे, लिंबूचा रस, एक चमचा दही, एक चमचा मध, एक चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चमचा मुलेठी पावडर एवढे साहित्य लागते. हे साहित्य घरातच उपलब्ध असते. पॅक बनविण्यासाठी केळी, अंड्याचा पांढरा भाग, दही, मध, मुलेठी पावडर, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून त्याची पेस्ट बनवावी. आता तुमचा फेसपॅक तयार झाला आहे. हा पॅक हलक्या हातांनी ५ मिनिटे मसाज करून चेहरा आणि मानेवर लावा. १० मिनिटांनंतर चेहरा धुऊन घ्यावा.

या फेस पॅकमधील केळी त्वचेला नरिश आणि रिव्हाइटलाइज करते. त्वचा मऊ होते आणि तेलकट दिसत नाही. अंड्यातील पांढरा बलक त्वचेचा भाग लहान करते. त्वचा टाइट होते आणि सुरकुत्या दिसत नाहीत. लिंबाच्या रसामधील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेचा संसर्गापासून बचाव करते. त्वचा आरोग्यदायी आणि तरुण बनते. तसेच फेस पॅकमधील दही त्वचेवर सुरकुत्या, डाग दूर करण्यात मदत करते. यामुळे त्वचा चमकदार होते. मधामुळे स्किन मॉश्चराइज राहते. मुरुमाची समस्या दूर होते. मुलेठी पावडर त्वचेला स्वच्छ ठेवते. गोरेपणा वाढतो. टॅनिंग दूर होऊन चमक येते. ऑलिव्ह ऑइलमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला रिजुविनेट आणि मॉइश्चराइज करतात. चमक आणि मऊपणा वाढतो.