आरोग्यनामा ऑनलाइन टीम : दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच कुटुंबातील कुणाला गंभीर आजाराने पिडल्यास दुष्काळात तेरावा महिनाच ! अशाच एका शेतकऱ्याच्या जावयाच्या हृदय प्रत्यारोपणासाठी २५ लाख रूपये खर्च आला आहे. प्रत्यारोपण झाले पण पैसे कसे भरायचे असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे.
अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील शिंपोरे गावातील गणेश काळे यांना २ वर्षांपूर्वी हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. दम लागणे, छाती भरून येणे असा त्रास होत होता. त्यांनी दवाखाना गाठला असता हृदय योग्यरित्या काम करत नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. ११ जून रोजी गणेश यांच्यावर पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २५ लाख रूपये खर्च आला आहे. तुटपूंज्या शेतीवर उदरनिर्वाह चालत असल्याने २५ लाख रूपये आणायचे कुठुन असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांना पडला आहे. त्यामुळे त्यांचे सासरे संभाजी नागवडे यांनी हे पैसे जमविण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे.
संभाजी नागवडे यांच्या मुलीचा आठ वर्षांपूर्वी गणेश यांच्याशी विवाह झाला आहे. दोन वर्षांपूर्वी गणेश यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर तपासणी केली असता त्यांचे हृदय केवळ २० टक्के कार्यरत असल्याने डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी २५ लाख रूपये खर्च आला आहे. येत्या दोन दिवसांत त्यांना २५ लाखांपैकी काहीतरी रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी सासरे आणि जाावयी त्यांची गहू, बाजरी आणि मका यांची शेती विकण्याच्या विचारात आहेत. दागिने सुद्धा विकणार आहेत. तरीही पैसे कमी पडले तर सावकाराकडून कर्ज काढण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. संभाजी नागवडे यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. तुमची छोटी मदतही आम्हाला दिलासा देणारी असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
मदत करण्यासाठी बँक डिटेल्स
NAME : GANESH KALE
Bank name : Union Bank of India (Branch Khed)
Account No. : 426802010533463
IFSC code : UBIN0542687