आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Heart Attack In Winter | थंडीचा हंगाम खुपच अल्हाददायक असतो. परंतु तो आपल्या सोबत अनेक प्रकारचे आजार सुद्धा घेऊन येतो. विशेषता हृदयाच्या रूग्णांसाठी हिवाळ्याचा हंगाम धोकादायक मानला जातो. संशोधनानुसार, या हंगामात हार्ट अटॅक, हार्ट फेलियर आणि अर्थिमिया होण्याची शक्यता वाढते. (Heart Attack In Winter)
या लोकांना असतो जास्त धोका
या हंगामात आपले शरीर आणि हृदयाला शरीराचे योग्य तापमान राखण्यात जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे हृदयावर जास्त दबाव येतो आणि कमजोर हृदय असलेल्यांना हार्ट फेलियरचा धोका वाढतो.
हृदयाच्या रूग्णांसाठी का धोकादायक आहे हिवाळ्याचा हंगाम –
1. हेल्थ एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात तापमानात घसरण येते आणि मनासिकदृष्ट्या शरीर गरम ठेवण्याचे संकेत मिळतात. कमी तापमान नर्व्हस सिस्टम अॅक्टिव्ह करते ज्यामुळे कॅटेकोलामाईनचा स्तर वाढतो. (Heart Attack In Winter)
2. हे कॅटेकोलामाईन रक्तवाहिन्यांना आकुंचित करते, ज्यामुळे हृदयगती, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो.
3. रक्त वाहिन्या आकुंचित झाल्यावर ब्लड क्लॉटिंग सुद्धा होऊ लागते. या सर्व गोष्टी हृदय विकाराच्या झटक्याचा धोका वाढवतात.
ही आहेत इतर कारणे –
– वायु प्रदूषण, फिजिकल अॅक्टिव्हिटीत कमतरता, मानसिक दबाव, खाण्या-पिण्याच्या खराब सवयी आणि या हंगामात होणार्या वायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा हार्ट अटॅक आणि फेलियरची शक्यता वाढते. (Heart Attack In Winter)
– ज्या लोकांचे हृदय कमजोर असते किंवा ज्यांना अगोदरपासून हृदय आजार असतात त्यांना या हंगामात जास्त धोका असतो. कारण यावेळी श्वास घेण्यास त्रास होतो.
– याशिवाय फ्लू आणि निमोनिया सारखे आजार होण्याची शक्यता सुद्धा या हंगामात जास्त असते.
–
हिवाळ्यात अशी घ्या हृदयाची काळजी –
1. हेल्थ एक्सपर्टनुसार, थंडीत गरम कपडे, हातमोजे आणि टोपी घालून शरीर गरम ठेवावे.
2. खुप जास्त स्मोकिंग आणि दारूचे सेवन टाळले पाहिजे.
3. योगा किंवा मेडिटेशन करावे, फिजिकल अॅक्टिव्हिटी वाढवा.
4. चांगली आणि पूर्ण झोप घेतल्याने हृदय निरोगी ठेवता येते.
5. आहारावर विशेष लक्ष ठेवा. खुप जास्त खारट, तिखट खाणे टाळा.
6. आहारात फळे आणि सलाडची मात्रा वाढवा.
7. वेळावेळी आरोग्य तपासणी करत राहा.
8. कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
Web Title :- Heart Attack In Winter | winter season risk of heart attack disease arrhythmia health tips in marathi