हॉटेलमधील ‘फिंगर बाऊलमध्ये’ हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – हॉटेलमध्ये जेवायला जायला कोणाला आवडत नाही. असा प्रश्न विचारला तर मला नाही आवडत असं म्हणनार कोणीच सापडणार नाही. कारण आज लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच हॉटेलमध्ये जेवायला जायला आवडते.हॉटेलमध्ये जेवायला गेलं की तिथं जेवणाच्या अनेक पद्धती असतात. ते काहींना कळतही नाही. तरी आपण त्याच पद्धतीने जेवण करण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी वेटर एका बाऊलमध्ये थोडं कोमट पाणी आणि लिंबाची एक फोड घेऊन येतो. आणि आपण त्यातच हात धुतो. आपल्याला पाश्चत्य संस्कृतीच्या अशाप्रकारच्या गुणांचे अनुकरण करण्याची जी घाणेरडी सवय लागली न ती खूप चुकीची आहे. कारण त्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकत.
हॉटेलमधील फिंगर बाऊलमध्ये हात धुण्याचे दुष्परिणाम खालीलप्रमाणे
१) त्या बाऊलमधील पाणी वाहते नसल्याने आपल्या हाताची घाण पुन्हा हाताला लागते. आणि आपल्या हाताची नखे बोटे तशीच राहतात. याच हाताने आपण पुन्हा काहीतरी खातो. आणि त्यामुळे त्यावरील जंतू आपल्या पोटात जातात. आणि वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळत. त्यामुळे हॉटेलमधील त्या बाऊलमध्ये हात धुणे चुकीचे आहे.
२) हात धुण्यासाठी आपल्याकडे मोठे भांडे नसल्याने आपल्याला जेवल्यावर नीट तोंड धुता येत नाहीत.ओठ साफ करता येत नाहीत. तसेच चूळही भरता येत नाही. त्यामुळे आपल्या शरीरावर जंतूंचे प्रमाण वाढते. त्याचा आपल्या आरोग्याला खूप मोठा धोका असतो.
३) आपण चूळ न भरल्यामुळे खाल्लेलं अन्न दातात आणि हिरड्यात तसेच राहते. त्यामुळे दातांच्या समस्या उध्दभवतात. त्यामुळे जेवण झाल्यावर चूळ भरणे खूप गरजेचे आहे. नाहीतर आपल्या आरोग्याच्या खूप समस्या निर्माण होतात. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण करायला गेल्यावर बाऊलमध्ये हात न धुता बेसिंगमध्ये चांगला हात धुवा. जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल.