पुणे :आरोग्यनाम ऑनलाईन- दूध आणि दुधाचे पदार्थ आवडत नाहीत असा माणूस आपल्याला संपूर्ण भूतलावावर सापडणार नाही . प्रत्येक माणसाला दुधाचे कोणते ना कोणते पदार्थ आवडत आसतातच. दुधापासून अनेक पदार्थ बनतात त्यात दही हा देखील खूप महत्वाचा पदार्थ आहे. त्याचबरोबर दररोजच्या जेवणात भात देखील प्रत्येक जण खात असतो. त्याचप्रमाणे दही आणि भात खाल्ल्याने आरोग्याला खूप चांगले फायदे मिळतात त्याचप्रमाणे आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्याचे काम देखील करत असते.
पाहूया दही आणि भात खाण्याचे प्रमुख फायदे:
दररोज दुपारच्या जेवण्यानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतात. यामुळे केवळ आरोग्य नाही तर पोटदेखील सुधारण्यास मदत होते .
का खास आहे दही-भात:
दही खाल्ल्याने ताण कमी येतो. तसेच तिखट खाण्याचे शौकिन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होत नाही. पित्त असेल तर दह्यामधले पाणी काढून दही खावे. दही खाल्ल्याने वजन देखील कमी होते. एका शोधाप्रमाणे दररोज ३०० ग्रॅम दही खायला पाहिजे. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात सर्वात जास्त प्रमाणात दह्याचे सेवन केलं जाते.
हे टाळा:
रात्री दह्याचे सेवन टाळावे. याने कफ होण्याची शक्यता असते. रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास यात साखर आणि मिरपूड टाकावी.