आरोग्यनामा टीम – तुमच्या घराच्या किचनमध्ये अनेक पदार्थ असे आहेत जे तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेवून निरोगी करण्याचं काम करतात. यापैकीच एक आहे भिजवलेले शेंगदाणे. आज आपण याचे अद्भूत फायदे जाणून घेणार आहोत.
1) बॉडी बिल्डींग – जर तुम्ही बॉडी बिल्डींग करत असाल तर शेंगदाण्यासारखा स्वस्त प्रोटीन सोर्स दुसरा कुठलाच नाही. सकाळी व्यायामानंतर याचं सेवन केल्यास अनेक लाभ मिळतात. जर तुम्ही शेंगदाणे भिजवून खाल्ले तर यातील पोषकतत्वं शरीरात पूर्णपणे शोषले जातात.
2) हृदयाच्या रोगांपासून बचाव – शेंगदाण्यामध्ये अनेक प्रभावी गुणधर्म असतात. एका शोधातून असं समोर आलं आहे की, यात कार्डियोप्रोटेक्टीव गुणधर्म असतात. यामुळं हृदयाच्या रोगांपासून तुम्ही दूर राहता.
3) मेंदूचे कार्य – शेंगदाण्यात प्रोटीन्स तर असतातच सोबतच तुम्हाला यातून ओमेगा 3 फॅटी अॅसिड्सही मिळतात. यामुळं मेंदूची कार्यक्षमता वाढते. शाळेतील मुलांनाही शेंगदाणे भिजवून खाल्ल्यानं मोठा लाभ होतो.
4) त्वचा चांगली राहते – शेंगदाण्यात अँटीऑक्सिडंट असतात. रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर त्वचा चांगली राहते. महागडे आणि केमिकलयुक्त साधनं वापरण्यापेक्षा हा घरगुती उपाय कधीही चांगला आहे.
5) पचनक्रिया – शेंगदाण्यात डाएटरी फायबर्स असतात. यामुळं पोट साफ होत नसेल तर सकाळीच भिजवलेले शेंगदाणे खा, यामुळं पोटात गॅस होणं आणि पोट साफ न होणं या समस्या येत नाहीत. तुम्ही निरोगी राहण्यास जास्त मदत होते.